Home /News /money /

Tax Saving : 80C अंतर्गतच नव्हे, तर ‘या’10 पद्धतींनी देखील वाचवा 5 लाखांपर्यंत टॅक्स

Tax Saving : 80C अंतर्गतच नव्हे, तर ‘या’10 पद्धतींनी देखील वाचवा 5 लाखांपर्यंत टॅक्स

कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम वाचवू शकतो. पण यापलीकडेही विविध मार्गांनी कर वाचवू शकतो. यामध्ये दीड लाख व्यतिरिक्त पाच लाख रुपयांपर्यंत आयकराची बचत करू शकता.

  नवी दिल्ली, 30 ऑक्टोबर : भारतात आयकर भरणाऱ्या नागरिकांची संख्या खूप कमी आहे. आयकर भरण्याच्या वेळी कर कसा वाचवता येईल याचा विचार करत असतो. भारतीय आयकर विभागाने दिलेल्या सुटीनुसार कलम 80C अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंत रक्कम वाचवू शकतो. पण यापलीकडेही विविध मार्गांनी कर वाचवू शकतो. यामध्ये दीड लाख व्यतिरिक्त पाच लाख रुपयांपर्यंत आयकराची बचत करू शकता. आयकर वाचवण्याचे हे 10 प्रकार National Pension System - NPS (80CCD (1B)) नॅशनल पेन्शन सिस्टीममध्ये 80C अंतर्गत दीड लाख रुपयांची बचत करू शकता. त्याचबरोबर 80CCD (1B) च्या अंतर्गत देखील आणखी 50 हजार रुपयांची बचत करू शकता. म्हणजेच या पेन्शन योजनेत एकूण 2 लाख रुपयांची बचत करता येईल. हेल्थ इन्शुरन्स (80D) - या पॉलिसीमध्येदेखील 80D अंतर्गत करात बचत करू शकता. यात 25 हजार रुपयांपासून 1 लाख रुपयांपर्यंत आयकरात बचत करू शकता. पण यामध्ये तुमच्या पॉलिसीमध्ये कोण कोण आहे आणि त्यांचे वय काय आहे यावर ही रक्कम अवलंबून आहे. त्यामुळे या पॉलिसीचा फायदा घेऊन तुम्ही करामध्ये मोठ्या प्रमाणात बचत करू शकता. शैक्षणिक कर्ज (80E)- कलम 80E अंतर्गत आयकरात सूट मिळू शकते. मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतलं असेल, तर ते फेडताना याचा लाभ मिळणार आहे. यामध्ये व्याजावर ही सूट घेऊ शकता. यामध्ये काहीही मर्यादा नसून, हवी तितकी सूट मिळवू शकता. त्याचबरोबर पालक आणि मुलगा या दोघांपैकी जो हे कर्ज फेडत आहे त्याला या बचतीचा फायदा होणार आहे. (वाचा - घरबसल्या 10 मिनिटांत फ्रीमध्ये बनवा Pan Card; जाणून घ्या प्रक्रिया) गृह कर्जावर सूट (कलम 24) - गृह कर्जाच्या रकमेवर देखील आयकर सूट मिळवू शकता. यामध्ये प्रिन्सिपल अमाउंटवर 80C च्या अंतर्गत दीड लाख रुपयांची सूट मिळवू शकता. त्याचबरोबर व्याजावर देखील कलम 24 अंतर्गत सूट मिळवता येईल. यामध्ये 2 लाख रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. त्याचबरोबर यासाठी मालमत्ता तुमच्या नावावर असणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही त्या घरात राहत नसाल आणि भाडयाने दिलं असेल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. पहिल्यांदा घर खरेदी केल्यास (80EE) - पहिल्यांदा घर खरेदी केल्यास त्याच्या व्याजावर तुम्हाला 80EE अंतर्गत सूट मिळणार आहे. या अंतर्गत तुम्ही 50 हजार रुपयांचा लाभ मिळवू शकता. त्यामुळे कलम 24 अंतर्गत मिळणारी सूट मिळून विचार केला, तर पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्या व्यक्तीला जवळपास अडीच लाख रुपयांचा आयकरात फायदा होणार आहे. परंतु यासाठी घराची किंमत 50 लाख रुपयांच्या आत आणि गृहकर्जाची रक्कम देखील 35 लाख रुपयांपेक्षा कमी असावी.

  (वाचा - कोरोना काळात नागरिकांच्या खात्यात सरकार पाठवणार पैसे, कुणाला, किती मिळणार रक्कम)

  HRA (80GG) - कंपनीमध्ये काम करत असताना, कंपनी HRA देत असेल तर सूट मिळते. जर याचा लाभ मिळत नसेल तर आयकरात यासाठी क्लेम करू शकत नाही. त्यामुळे स्वतःचा व्यवसाय करत असाल, तर आयकराच्या या सुटीचा लाभ घेऊ शकणार नाही.

  बँकेतील बचत खात्यावरील व्याज (80TTA) -

  80TTA अंतर्गत बँकेतील बचत खात्यात 10 हजार रुपयांपर्यंतच्या व्याजावर आयकरात सूट मिळवू शकता. यासाठी तुमचं खातं बँक, को ऑपरेटिव्ह सोसायटी आणि पोस्ट ऑफिसमध्ये असायला हवं. समजा, चार बचत खात्यात 15 हजार रुपये व्याज मिळत असेल, तर 10 हजार रुपयांच्या व्याजावर सूट मिळणार आहे. पण उर्वरित 5 हजार रुपयांवर कर भरावा लागणार आहे. त्याचबरोबर यासाठी कोणतीही अट नसून सर्व वयोगटातील नागरिकांना याचा लाभ घेता येतो. अपंग मेडिकल खर्च (80DD) - घरामध्ये कुणी अपंग व्यक्ती असल्यास आणि त्याच्यावर खर्च होत असल्यास यामध्ये देखील तुम्हाला सूट मिळणार आहे. कलम 80DD अंतर्गत सूट मिळवू शकता. यामध्ये अपंगत्वाची टक्केवारी किती आहे यावर ही आयकर सूट अवलंबून आहे. त्यामुळे या खर्चावर 75 हजार रुपयांपासून सव्वा लाख रुपयांपर्यंत आयकर सूट मिळू शकते. (वाचा - देशात कोणतं Aadhaar Card आहे मान्य; UIDAI ने दिली संपूर्ण माहिती) विशेष आजाराच्या उपचारावर खर्च (80DDB) - आयकरात या आजारांवरील खर्च दाखवल्यास सूट मिळू शकते. कॅन्सर, न्यूरोलॉजिकल आजारांवर होणाऱ्या खर्चाची बिलं सादर केल्यास आयकरात सूट मिळू शकते. कलम 80DDB अंतर्गत 40 हजार रुपयांपर्यंत आयकर सूट मिळवू शकता. त्याचबरोबर जेष्ठ नागरिक यात 1 लाख रुपयांपर्यंत सूट मिळवू शकतात. डोनेशन (80G) - कलम 80G अंतर्गत दान केल्यास रकमेवर आयकर सूट मिळू शकते. मान्यताप्राप्त संस्था आणि सामाजिक संस्थांना दान केल्यास तुम्हाला हा लाभ मिळणार आहे.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  Tags: Income tax

  पुढील बातम्या