Pm Kisan Scheme: तुमच्या बँक खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता आला का? इथे तपासा

Pm Kisan Scheme: तुमच्या बँक खात्यात 2 हजार रुपयांचा हप्ता आला का? इथे तपासा

शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेचा आठवा हप्ता आज 10 मे 2021 ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी सरकार प्रत्येक शेतकऱ्याला तीन हप्त्यांत 6 हजार रुपयांची आर्थिक मदत देते.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : देशातील शेतकऱ्यांसाठी पीएम किसान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या रकमेचा आठवा हप्ता आज 10 मे 2021 ला शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या मदतीचा पहिला हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असून तो 14 मेपर्यंत जमा होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. हा हप्ता 2 हजार रुपयांचा आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील (PM Kisan Samman Nidhi) पहिला हप्ता साधारणपणे 20 एप्रिलपर्यंत बँकेत जमा केला जातो, पण या वर्षी थोडा उशीर झाला आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी सरकार प्रत्येक शेतकऱ्याला तीन हप्त्यांत 6 हजार रुपयांची आर्थिक मदत (Financial Support to Farmers) देते.

कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार फायदा?

या योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्याकडे पाच एकर शेतजमीन (Agricultural Land) आहे त्यालाच याचा फायदा मिळतो. आता सरकारने ती जमीन कसण्यासंबंधी अट बंद केली आहे. ज्या व्यक्तीच्या नावे शेतजमीन आहे त्याला ही मदत मिळते, पण टॅक्स रिटर्न भरणाऱ्या व्यक्तीच्या नावे जमीन असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळत नाही. वकील, डॉक्टर, सीए (Doctor, Lawyer, CA) यांनाही हा लाभ घेता येत नाही.

2018-19 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 8 वा हप्ता दिला जात असून, त्यासाठी केंद्र सरकार बँकेत 9 कोटी रुपये जमा करणार आहे.

(वाचा - LICग्राहकांसाठी मोठी बातमी;आजपासून नवा नियम लागू,वाचा तुमच्यावर काय होणार परिणाम)

यादीत नाव आहे का असं तपासा -

या योजनेच्या अधिकृत वेबसाईट https://pmksan.gov.in/ वर जा. होम पेजवर Farmers Corner वर क्लिक करा. तिथं Beneficiaries List यावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्यासमोर एक यादी येईल त्यामध्ये तुम्हाला राज्य, जिल्हा, तालुका, ब्लॉक आणि गाव निवडावं लागेल. त्यानंतर Get Report वर क्लिक करा. मग या योजनेच्या लाभार्थींची संपूर्ण यादीच तुमच्यासमोर येईल त्यात तुमचं नाव शोधा.

(वाचा - PM Kisan Scheme : तुमच्या खात्यात 2 हजार जमा झाले का? नसतील तर 'अशी' करा तक्रार)

घरबसल्या करा रजिस्ट्रेशन -

या योजनेसाठी तुम्ही घरबसल्या रजिस्ट्रेशन करू शकता. त्यासाठी तुमच्या शेताचा सातबारा उतारा, आधार कार्ड, मोबाईल क्रमांक आणि बँक अकाउंट क्रमांक असायला हवा. रजिस्ट्रेशन करण्यासाठी -

- अधिकृत वेबसाईट https://pmkisan.gov.in वर जा.

- आता Farmers Corner वर जा.

- इथं 'New Farmer Registration' वर क्लिक करा.

- आधार नंबर टाका.

- कॅप्चा कोड टाकून राज्य निवडा आणि प्रक्रिया पूर्ण करत पुढे जा.

- वैयक्तिक माहिती भरा.

- बँक खातं आणि शेतजमिनी संबंधीची माहिती भरा.

- फॉर्म सबमिट करा.

(वाचा - मोदी सरकारची मोठी घोषणा;नोकरदार वर्गाला फ्रीमध्ये मिळणार 7लाख रुपयांची ही सुविधा)

अशा प्रकारे तुमचं या योजनेत रजिस्ट्रेशन होईल आणि तुम्ही त्या योजनेसाठी पात्र किंवा अपात्र ठरलात, तर त्यासंबंधी माहिती तुम्हाला मिळेल. पात्र ठरलात तर तुमच्या बँक खात्यात पुढच्या हप्त्याच्या दिवशी पैसे जमा होतील.

First published: May 10, 2021, 2:07 PM IST

ताज्या बातम्या