• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Bank Holidays: पुढे 8 दिवस बंद राहणार बँका, कोरोना काळात खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays: पुढे 8 दिवस बंद राहणार बँका, कोरोना काळात खोळंबा टाळण्यासाठी इथे तपासा सुट्ट्यांची यादी

Bank Holidays: बँकेशी संबंधित कामांसाठी जर तुम्हाला बँक शाखेत जाण्याची आवश्यकता असेल तर बँकांच्या सुट्ट्यांची यादी तपासूनच घराबाहेर पडा. अन्यथा कोरोना काळात तुमचा खोळंबा होऊ शकतो.

  • Share this:
    नवी दिल्ली, 09 मे: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे (Second Wave of Coronavirus) देशात हाहाकार माजला आहे. दररोज 4 लाख नवे कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. ही परिस्थिती पाहता अनेक बँकांनी त्यांच्या ग्राहकांना बँकेशी संबंधित काम शक्यतो ऑनलाइन करण्याचा सल्ला दिला आहे. विविध बँकांकडून याबाबत दरवेळी ग्राहकांना अलर्ट आणि अपडेट्स पाठवले जात आहे. बँकांकडून देण्यात येणाऱ्या इंटरनेट बँकिंग (Internet Banking) आणि इतर ऑनलाइन सुविधांमध्ये (Online Banking) देखील वाढ झाली आहे. दरम्यान असे असून देखील तुम्हाला एखादे बँकेचे अत्यावश्यक काम असेल आणि ज्याकरता तुम्हाला बँकेच्या शाखेत (Bank Branch) जाणं अनिवार्य असेल, तर बँका कधी बंद (Bank Holidays)आहेत हे जाणून घेणं आवश्यक आहे. जेणेकरून कोरोना लॉकडाऊन काळात होणारा खोळंबा टाळता येईल. सुट्ट्यांबाबत सर्व राज्यांसाठी नियम वेगळे आरबीआयच्या वेबसाइटनुसार (Bank Holidays List May 2021) मे मध्ये एकूण 12 दिवस बँका बंद असणार आहेत. यामध्ये आठवड्याच्या सुट्ट्या देखील समाविष्ट आहेत. यापैकी काही सुट्ट्या झाल्या आहेत, तर अद्यापही आठ सुट्ट्या बाकी आहेत. अर्थात उर्वरित महिन्यात आणखी आठ दिवस बँका बंद राहणार आहेत. आरबीआयच्या वेबसाइटनुसार काही सुट्ट्या काही ठराविक राज्यात असतात, इतर राज्यांवर त्याचा परिणाम होत आहे. उदाहरणार्थ जर एखादा राज्यात ठराविक सण साजरा केला जातो, तर त्याची सुट्टी इतर राज्यांमध्ये दिली जाणार नाही. हे वाचा-सरकार या महिलांच्या खात्यात पाठवतंय 5 हजार रुपये, पाहा रजिस्ट्रेशनची प्रक्रिया इथे तपासा सुट्ट्यांची यादी -9 मे: रविवार (सर्व राज्यात सुट्टी) -13 मे: रमजान ईद (ईद-उल-फितर). यादिवशी बेलापूर, जम्मू, कोचीन, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरममध्ये इ. ठिकाणी बँका बंद असतील -14 मे: भगवान श्री परशुराम जयंती / रमजान ईद (ईद-उल-फितर) / बसवा जयंती / अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2021) यादिवशी बेलापूर, जम्मू, कोचीन, मुंबई, नागपूर, श्रीनगर, तिरुवनंतपुरममध्ये इ. ठिकाणी बँका बंद असतील -16 मे: रविवार (सर्व राज्यात सुट्टी) हे वाचा-डेअरी व्यवसायातून महिन्याला होईल 70 हजार कमाई, सरकारही करेल मदत -22 मे: चौथा शनिवार (सर्व राज्यात सुट्टी) -23 मे: रविवार (सर्व राज्यात सुट्टी) -26 मे: बौद्ध पौर्णिमा. या दिवशी आगरतळा, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, देहरादून, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर इ. ठिकाणी बँका बंद राहतील. -30 मे: रविवार (सर्व राज्यात सुट्टी)
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: