नवं सरकार स्थापन झाल्यानंतर 'या' कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

नवं सरकार स्थापन झाल्यानंतर 'या' कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार वाढ

ही पगारवाढ वेगवेगळ्या फेजेसमध्ये होईल. ही पगारवाढ त्यांच्या त्यांच्या कामाप्रमाणे दिली जाईल.

  • Share this:

मुंबई, 22 मे : लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना मोठी खुशखबर मिळणार आहे. नवीन सरकार तयार झाल्यानंतर  केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होणार आहे. सरकारनं आधीच कर्मचाऱ्यांसाठी पगार आणि भत्यांमध्ये वाढ करण्याची घोषणा केलीय.

फक्त 50 हजार रुपयांमध्ये सुरू करा हा व्यवसाय, बाकीची मदत करेल सरकार

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कमीत कमी पगारात वाढ करण्याची आशा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्माण झाली होती. पण आचारसंहिता लागू झाल्यामुळे केंद्र सरकारनं कुठलीच घोषणा केली नव्हती. केंद्र सरकारचे कर्मचारी 18 हजार रुपयांपासून 26 हजार रुपयांपर्यंत कमीत कमी पगारात वाढ करण्याची मागणी करतायत.

महाराणी एलिझाबेथसोबत करियरची संधी, काम रोज 7 तास आणि मिळणार 'या' सुविधा

वेगवेगळ्या फेजमध्ये होईल वाढ

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मनात आशेचा किरण जागा झालाय. कमीत कमी पगारात वाढ होणार आहे. ही पगारवाढ वेगवेगळ्या फेजेसमध्ये होईल. ही पगारवाढ त्यांच्या त्यांच्या कामाप्रमाणे दिली जाईल.

लोकसभा 2019 : ....तर निकालासाठी लागू शकतात 2- 3 दिवस; कल स्पष्ट व्हायलाही दुपार उजाडणार

या कर्मचाऱ्यांचा वाढेल पगार

सूत्रांच्या माहितीनुसार जवळजवळ 9 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार वाढू शकतो. ही पगारवाढ सीमा सुरक्षा दल (BSF), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल ( CISF ), ITBP, SSB, भारतीय रेल्वे कर्मचारी, आयटीएस यांना लागू होणार.

SPECIAL REPORT : एक्झिट पोल खरंच विश्वासार्ह आहे का?

First published: May 22, 2019, 3:06 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading