7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; एक जुलैपासून वाढीव महागाई भत्ता मिळणार

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर; एक जुलैपासून वाढीव महागाई भत्ता मिळणार

डीए एरिअर्सचा हिशेब केला, तर सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल वनच्या पे-स्केलनुसार किती पैसे खात्यात जमा होतील पाहूयात...

  • Share this:

नवी दिल्ली, 22 जून: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खूशखबर आहे. सातव्या वेतन आयोगानुसार किमान 52 लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना एक जुलैपासून वाढीव महागाई भत्ता (Dearness Allowance) मिळणार आहे. त्यामुळे त्यांच्या पगाराच्या संरचनेत (Pay Matrix), तसंच रकमेतही (Salary) मोठी वाढ होणार आहे. 26 जून रोजी नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमची (National Council of JCM) सरकारी अधिकाऱ्यांसोबत बैठक होणार असून, त्यात डीएच्या एरिअर्सबद्दल (DA Arrears) म्हणजेच थकबाकीबद्दलचा निर्णय होणार आहे.

26 जून रोजी होणाऱ्या बैठकीत आपल्या बाजूने निर्णय होईल, असा विश्वास केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना आहे. केंद्र सरकारी कर्मचारी किती डीए अॅरिअर्सची अपेक्षा करू शकतात, हे एका साध्या कॅल्क्युलेशनवरून कळेल, असं नॅशनल कौन्सिल ऑफ जेसीएमचे सचिव शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितलं. 'डीएनए इंडिया डॉट कॉम'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

लेव्हल वनवरच्या आणि 18 हजार रुपये वेतनश्रेणी असलेल्या कर्मचाऱ्याला आणि सातव्या वेतन आयोगानुसार 18 हजार ते 56 हजार या रेंजमध्ये वेतन असलेल्या कर्मचाऱ्याला 18 हजार रुपयांचं मूळ वेतन (Basic Pay) मिळतं. जानेवारी 2020 ते जून 2020 या कालावधीतला 4 टक्के दराने डीए, जुलै 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीतला 3 टक्के दराने डीए आणि जानेवारी 2021 ते जून 2021 या कालावधीतला प्रस्तावित 4 टक्के डीए एक जुलै 2021पासून दिला जाणार आहे.

मोदी सरकारचं सामान्यांना गिफ्ट! या महिन्यात मिळेल मोफत LPG गॅस सिलेंडर, वाचा कुणाला मिळेल लाभ?

याच्या आधारे डीए एरिअर्सचा हिशेब केला, तर सातव्या वेतन आयोगानुसार लेव्हल वनच्या पे-स्केलनुसार किती पैसे खात्यात जमा होतील, याचा हिशेब

डीएचा थकबाकी कालावधी

जानेवारी 2020 ते जून 2020 : 4320 रुपये ते 13,656 रुपये

जुलै 2020 ते डिसेंबर 2020 : 3240 रुपये ते 10,242 रुपये

जानेवारी 2021 ते जून 2021 : 4320 रुपये ते 13,656 रुपये

याचा अर्थ असा, की 18 हजार रुपये बेसिक पे असलेल्या कर्मचाऱ्याला तीन महिन्यांचा डीए एरिअर 4320 3240 4320 = 11880 रुपये एवढा मिळेल.

56 हजार रुपये एवढा बेसिक पे असलेल्या कर्मचाऱ्याला तीन महिन्यांचा डीए अॅरिअर 136561024213656 = 37,554 रुपये एवढा मिळेल.

एअर इंडियाची मालमत्ता लिलावात; बांद्र्यातील इमारत 150 कोटी, मात्र ग्राहकांची पाठ

'हे आकडे कदाचित कमी वाटू शकतील; मात्र हे गणित कमीत कमी बेसिक पेवर आधारित आहे. लेव्हल 13 किंवा लेव्हल 14च्या कर्मचाऱ्यांचं वेतन मोठं असल्याने त्यांचं गणित केल्यास लाखो रुपये डीए एरिअर्स रूपात मिळतील,' असं शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितलं. त्यामुळे केंद्र सरकारने डीए एरिअर्सना मंजुरी दिली, तर जुलै महिन्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या खात्यात लाखो रुपये जमा होऊ शकतात. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना टीए, डीए आणि अन्य भत्ते सातव्या वेतन आयोगानुसार दिले जातात.

पे-स्केल 14नुसार डीए एरिअर्सचा हिशेब

जानेवारी 2020 ते जून 2020 (144200चे 4% ) X6 = 34,608 रुपये

जुलै 2020 ते डिसेंबर 2020 (144200चे 3% ) X6 = 25,956 रुपये

जानेवारी 2021 ते जून 2021 (144200चे 4% ) X6 = 34,608 रुपये

एकूण = 95,172 रुपये

Published by: Sunil Desale
First published: June 22, 2021, 10:14 PM IST

ताज्या बातम्या