2025पर्यंत साडेसात कोटी नोकऱ्या जाणार, तुमची नोकरी असेल का सुरक्षित?

2025पर्यंत साडेसात कोटी नोकऱ्या जाणार, तुमची नोकरी असेल का सुरक्षित?

आर्टिफिशल इंटेलिजन्स AIमुळे मशीन्सची कार्यक्षमता वाढेल, तेव्हा अनेकांना नोकरी गमवावी लागेल

  • Share this:

मुंबई, 17 एप्रिल : गेले काही वर्ष एका गोष्टीची खूप चर्चा सुरू आहे. ती म्हणजे आर्टिफिशल इंटेलिजन्स AIमुळे मशीन्सची कार्यक्षमता वाढेल, तेव्हा अनेकांना नोकरी गमवावी लागेल का? तज्ज्ञांच्या मते यामुळे डेटा एंट्री करणाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येऊ शकते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोकरी जाऊ शकेल अशांमध्ये डाॅक्टर, पत्रकार आणि वकील यांच्यावर हे संकट येऊ शकतं. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये वेगळंच म्हटलंय.

हा रिपोर्ट वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरमचा (WEF) आहे. यात असं म्हटलंय की काही वर्षांमध्ये जितके रोजगार कमी झाले, त्यापेक्षा 6 कोटी रोजगार निर्माण झालेत.

AIमुळे उत्पादन क्षमता वाढते. सगळी कामं कम्प्युटर आणि रोबो करत असतील तर चुकाही कमी होतील. वर्ल्ड इकाॅनाॅमिक फोरमनं फ्युचर आॅफ जाॅब्स नावाचा अहवाल सादर केलाय.

या अहवालानुसार येणाऱ्या 7 वर्षांत म्हणजे 2025पर्यंत माणसाची अर्धी कामं मशीन्स करतील. आता माणसाची कामं 29 टक्के मशीन्स करतात. पुढे अख्ख्या जगात 7.5 कोटी लोकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागतील. पण चांगली गोष्ट हीसुद्धा आहे की मशीन्स आल्यनं 13.3 कोटी नव्या नोकऱ्या मिळतील. बाजारात 5.8 कोटी जास्त नोकऱ्या बाजारात येतील.

या रोजगारांमध्ये जोरदार वाढ

अशा वेळी डेव्हलपर्स की, ई काॅमर्स आणि सोशल मीडिया स्पेशॅलिस्टना मागणी वाढेल. वेब आणि साॅफ्टवेअर डेव्हलपर्स यांना सुवर्णसंधी असेल. 'लिंक्डइन'नं सांगितलंय की साॅफ्टवेअर इंजिनियर्स आणि मार्केटिंगमधल्या नोकऱ्यांमध्ये वाढ होईल.

या क्षेत्राला मागणी जास्त

त्यावेळी लोकांकडे जास्त डिव्हाइस असतील. त्यामुळे कस्टमर सर्विस देणाऱ्यांची गरज जास्त वाढेल. जी मशीन्स तयार होतील, ती विकण्यासाठी सेल्स आणि मार्केटिंगची गरज लागेल. आर्टस आणि कल्चर क्षेत्रात मागणी वाढल्यानं गायन, नृत्य, चित्रकला, सिनेमे बनवणं या क्षेत्रातले रोजगार कमी होणार नाही.

नोकरी टिकवण्यासाठी काय कराल?

तुम्हाला नव्या काळाप्रमाणे तुमच्यात बदल करावे लागतील. नव्या गोष्टी शिकाव्या लागतील.

जेव्हा 20 सिंहांचा कळप गावच्या दिशेनं येतो...

First published: April 17, 2019, 6:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading