इथे 5 टोमॅटोंची खरेदी करण्यासाठी मोजावे लागतात 50 लाख!

इथे 5 टोमॅटोंची खरेदी करण्यासाठी मोजावे लागतात 50 लाख!

एका ठिकाणी भाजी बाजारात टोमॅटोचे भाव किती असतील, असा तुमचा अंदाज आहे? 5 टोमॅटोंची खरेदी करण्यासाठी 50 लाख लागतील, असं तुम्हाला सांगितलं तर? पण खरंच असं घडलंय.

  • Share this:

नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर : एका ठिकाणी भाजी बाजारात टोमॅटोचे भाव किती असतील, असा तुमचा अंदाज आहे ? 5 टोमॅटोंची खरेदी करण्यासाठी 50 लाख रुपये लागतील, असं तुम्हाला सांगितलं तर? पण एका देशात खरंच 5 टोमॅटोंची किंमत एवढी आहे. हे टोमॅटो घ्यायचे असतील नोटांनी भरलेली बॅग घेऊन जावं लागतं !

व्हेनेझुएलामध्ये महागाईमुळे लोक एकाच वेळी जेवण करू शकतात. त्याचवेळी 5 टोमॅटोंसाठी 50 लाख बोलिव्हर मोजावे लागतात. बोलिव्हर हे व्हेनेझुएलाचं चलन आहे.

आर्थिक मंदीचा फटका

फक्त व्हेनेझुएलाच नाही तर जगभरात बाकीच्या देशांमध्येही आर्थिक मंदीच्या झळा बसतायत. इजिप्त, लिबिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ कांगो या देशांतही महागाईचा दर वाढला आहे. तेल उत्पादक असलेल्या इराणलाही या जागतिक मंदीचा फटका बसलाय.

(हेही वाचा : पोस्टाच्या या योजनेचा दुहेरी लाभ, बचतही होणार आणि दर महिन्याला कमाईही)

हा देश पाचव्या स्थानावर

जगभरात सगळ्यात जास्त महागाई दर असलेल्या देशांमध्ये अर्जेंटिना पाचव्या स्थानावर आहे. त्याचबरोबर येमेन, सुदान यांनाही महागाईच्या वाढत्या दराचा सामना करावा लागतोय.

व्हेनेझुएलामध्ये गेल्या वर्षभरापेक्षा जास्त काळ महागाईमुळे सामान्य माणूस पिचून गेला आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी लाखो बोलिव्हर लागत असतील तर करायचं काय या चिंतेनं त्यांना ग्रासलं आहे.

=================================================================================

VIDEO : आदित्य ठाकरे अजून लहान, रामदास आठवलेंनी दिला सेनेला सल्ला

First published: November 1, 2019, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading