LED आणि LCD टीव्ही महागणार; सरकारचा नवा नियम लागू

LED आणि LCD टीव्ही महागणार; सरकारचा नवा नियम लागू

केंद्र सरकारकडून 1 ऑक्टोबरपासून एलईडी आणि एलसीडी टीव्हीच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उपयोग होणाऱ्या एका महत्त्वाच्या घटकावर 5 टक्के सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्यूटी (Custom Duty) लागू करण्यात आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 2 ऑक्टोबर : नवीन कलर टीव्ही (Color Television) खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. केंद्र सरकारकडून 1 ऑक्टोबरपासून एलईडी आणि एलसीडी टीव्हीच्या मॅन्युफॅक्चरिंगमध्ये उपयोग होणाऱ्या एका महत्त्वाच्या घटकावर 5 टक्के सीमा शुल्क अर्थात कस्टम ड्यूटी (Custom Duty) लागू करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे टीव्हीच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने (Government of India) 30 सप्टेंबरपासून, ओपन सेलच्या (Open Cell) आयातीवर (Import) देण्यात आलेली 5 टक्के कस्टम ड्यूटी सवलत काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. LED TV मध्ये ओपन सेल, पिक्चर ट्यूबप्रमाणे काम करतं. ज्याचं उत्पादन भारतात होत नाही. टीव्ही बनवणाऱ्या कंपन्या ओपन सेल आयात करतात, ज्यावर आतापर्यंत कोणतंही शुल्क आकारलं जात नव्हतं. परंतु आता केंद्र सरकार ओपन सेलच्या आयातीवर 1 ऑक्टोबरपासून 5 टक्के शुल्क आकारणार आहे.

कलर टीव्हीसाठी ओपन सेल सर्वात महत्त्वाचा पार्ट असतो. त्यावरच कस्टम ड्यूटी लागू झाल्याने भारतातील टेलिव्हिजनच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.

हे वाचा - Google चा Pixel 5, Pixel 4a 5G स्मार्टफोन लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

किती महागणार टीव्ही?

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर, टीव्हीच्या किंमती 600 ते 1500 रुपयांपर्यंत वाढ शकत असल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. परंतु सरकारने, या निर्णयानंतर टीव्हीच्या किंमतीत केवळ 150-250 रुपयांचा फरक पडणार असल्याचं सांगितलं आहे. देशात मॅन्युफॅक्चरिंग वाढण्यासाठी कस्टम ड्यूटीवरील सूट काढण्याचा आणि टीव्ही सेट्सच्या आयातीवर रोख लावण्यात आली असल्याचं सांगण्यात आलं आहे.

केंद्र सरकारने गेल्या वर्षी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत कस्टम ड्यूटीतून ओपन सेलच्या आयातीला सूट दिली होती. देशांतर्गत उद्योगांनी उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी हा वेळ मागितला होता. मात्र आता अर्थ मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, एलईडी-एलसीडी टीव्ही पॅनलसाठी ओपन सेलवर 5 टक्के कस्टम ड्यूटी लावण्याची तरतूद लागू करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: October 2, 2020, 2:03 PM IST
Tags:

ताज्या बातम्या