मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सरकारकडून आधार कार्डवर मिळतंय 5 लाखांचं कर्ज, व्हायरल मेसेजबाबत सरकारने काय म्हटलं?

सरकारकडून आधार कार्डवर मिळतंय 5 लाखांचं कर्ज, व्हायरल मेसेजबाबत सरकारने काय म्हटलं?

Loan on Aadhar Card: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये केंद्र सरकार सर्व नागरिकांना त्यांच्या आधार कार्डवर 4.78 लाख रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा केला जात आहे.

    मुंबई, 17 ऑगस्ट : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल काही सांगू शकत नाही. असाच एक मेसेज मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे की, मोदी सरकार आधार कार्डवर सुलभ कर्ज देत आहे. तुम्हालाही असा मेसेज आला असेल तर त्याला बळी पडण्यापूर्वी ही बातमी वाचा. केंद्र सरकार युवक आणि बेरोजगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे. सुलभ कर्ज देण्याबाबत, सरकारने मुद्रा कर्ज योजना आधीच सुरू केली आहे, ज्यामध्ये तरुणांना त्यांचा रोजगार सुरू करण्यासाठी कमी दरात सुलभ कर्ज दिले जात आहे. व्हायरल होत असलेल्या मेसेजबाबत सरकारने लोकांना अलर्ट केले आहे. Multibagger Share: 9 रुपयांचा शेअर 3700 रुपयांवर, गुंतवणूकदारांचे 1 लाख बनले 4 कोटी व्हायरल मेसेजमध्ये काय म्हटलंय? सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या मेसेजमध्ये केंद्र सरकार सर्व नागरिकांना त्यांच्या आधार कार्डवर 4.78 लाख रुपयांचे कर्ज देत असल्याचा दावा केला जात आहे. ज्यांच्याकडे आधार कार्ड आहे ते या कर्जासाठी अर्ज करू शकतात. यापूर्वी एका व्हायरल मेसेजमध्ये असाही दावा केला जात होता की, बेरोजगार तरुणांना सरकार 6,000 रुपये भत्ता देत आहे आणि त्याची नोंदणीही सुरू झाली आहे. सरकारचं स्पष्टीकरण व्हायरल पोस्टचे फॅक्ट चेकनंतर पीआयबीच्या वतीने ट्विट करून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. हा दावा पूर्णपणे बोगस असून सरकारकडून असे कोणतेही कर्ज दिले जात नाही, असे पीआयबीने म्हटले आहे. PIB ने लोकांनी असे मेसेज शेअर करू नका असा सल्लाही दिला आहे. पीआयबीने म्हटले आहे की फसवणूक करणारे लोक अशा प्रकारची फसवणूक करून त्यांची वैयक्तिक माहिती गोळा करतात, जेणेकरून त्यांच्या खात्यांमध्ये प्रवेश करणे सोपे होते. आधारवर उपलब्ध कर्जाबाबत तज्ज्ञ काय म्हणतात? बँकिंग तज्ज्ञ अश्विनी राणा सांगतात की, अनेक बँका आधारद्वारे वैयक्तिक कर्ज देतात. आधार हे तुमचे प्राथमिक ओळखपत्र मानले जाते आणि अशा कर्जासाठी कोणतेही तारण भरावे लागणार नाही. केवायसी केल्यानंतर, बँका पगार स्लिप किंवा इतर कागदपत्रांशिवाय आधारद्वारे एक लाख रुपयांपर्यंत कर्ज देतात. मात्र कर्ज मिळणे पूर्णपणे तुमच्या चांगल्या क्रेडिट स्कोअरवर अवलंबून असते. जर तुमचा CIBIL स्कोर 700 च्या वर असेल तर तुम्हाला कर्ज सहज मिळेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Aadhar card, Loan, Money

    पुढील बातम्या