मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Monsoon Sale: अवघ्या 1099 रुपयात करा विमानप्रवास, या एअरलाइन्सची घोषणा

Monsoon Sale: अवघ्या 1099 रुपयात करा विमानप्रवास, या एअरलाइन्सची घोषणा

विस्तारा एअरलाइन्सने (Vistara Airlines) देशांतर्गत प्रवासाकरिता 48 तासांचा विशेष मान्सून सेल (Monsoon Sale) आयोजित केला आहे. 24 जूनला मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू होणारा हा सेल 25 जूनच्या मध्यरात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे

पुढे वाचा ...

नवी दिल्ली, 24 जून: विस्तारा एअरलाइन्सने (Vistara Airlines) देशांतर्गत प्रवासाकरिता 48 तासांचा विशेष मान्सून सेल (Monsoon Sale) आयोजित केला आहे. 24 जूनला मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू होणारा हा सेल 25 जूनच्या मध्यरात्री 11 वाजून 59 मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत इकॉनॉमी, प्रीमिअम इकॉनॉमी आणि बिझनेस या तिन्ही क्लासेसमधली एक ऑगस्ट ते 12 ऑक्टोबर 2021 या कालावधीतल्या प्रवासासाठीची तिकिटं सवलतीत बुक करता येणार आहेत.

विस्ताराचे चीफ कमर्शियल ऑफिसर विनोद कन्नन (Vinod Kannan) यांनी सांगितलं, 'कोविड-19च्या दुर्दैवी दुसऱ्या लाटेमुळे अनेकांना त्यांचे प्रवासाचे बेत रद्द करावे लागले किंवा पुढे ढकलावे लागले. परिस्थिती हळूहळू सुधारते आहे आणि प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे आम्ही भारतीयांच्या आवडती एअरलाइन म्हणून तिकिटांवर आकर्षक सवलत जाहीर करत आहोत.'

या योजनेअंतर्गत इकॉनॉमी क्लासचे (Economy Class) तिकीटदर अवघ्या 1099 रुपयांपासून सुरू होत आहेत. प्रीमिअम इकॉनॉमी क्लासचे तिकीटदर 2099 रुपयांपासून, तर बिझनेस क्लासचे तिकीटदर 5999 रुपयांपासून सुरू होत आहेत, असं विस्तारा कंपनीच्या वेबसाइटवर म्हटलं आहे. या योजनेअंतर्गत मुंबई-गोवा, मुंबई-चेन्नई, बेंगळुरू-गोवा, दिल्ली-इंदूर, दिल्ली-लखनौ आदी मार्गांवर प्रवास करण्यासाठी इकॉनॉमी क्लासचं तिकीट अवघ्या 1699 रुपयांत उपलब्ध होणार आहे. इकॉनॉमी क्लासचं दिल्ली-चंडीगड मार्गाचं तिकीट केवळ 1099 रुपयांत उपलब्ध असून, बेंगळुरू-चेन्नई तिकीट 1399 रुपयांत, तर बेंगळुरू-हैदराबाद तिकीट केवळ 1449 रुपयांत उपलब्ध असल्याची माहिती विस्ताराच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे.

हे वाचा-Indian Oil च्या लकी ड्रॉमध्ये मिळेल मोबाइल आणि TV? वाचा काय आहे दावा

विस्ताराची वेबसाइट, आयओएस आणि अँड्रॉइड मोबाइल अॅप, विस्ताराची विमानतळावरची तिकीट कार्यालयं, एअरलाइनचं कॉल सेंटर, ट्रॅव्हल एजंट्स अशा सर्व माध्यमांतून या सेलअंतर्गत तिकिट्स बुक करता येणार आहेत. डायरेक्ट चॅनेल डिस्काउंट्स, कॉर्पोरेट डिस्काउंट्स, सॉफ्ट बेनिफिट्स, व्हाउचर्स आदींची सांगड या सवलत योजनेशी घालता येणार नाही, असंही विस्तारातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या सीट्स मर्यादित असून, त्या फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह अर्थात प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर बुकिंगसाठी उपलब्ध आहेत, असं कंपनीने कळवलं आहे. विस्तारा ही टाटा सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि सिंगापूर एअरलाइन्स लिमिटेड यांची संयुक्त कंपनी आहे.

हे वाचा-सौरऊर्जेबाबत Relianceचं मोठं पाऊल, मोदींचं हे लक्ष्य साध्य करण्यासाठी निर्णय

कोविड-19 प्रतिबंधक लसीकरण पूर्ण झालेले पायलट्स आणि केबिन क्रू (Fully Vaccinated Crew) यांच्यासह विमानसेवा चालवणारी भारतातली पहिली एअरलाइन कंपनी बनण्याचा मान नुकताच विस्ताराला मिळाला. येत्या काळात अशा प्रकारे लसीकरण पूर्ण झालेल्या क्रूसह चालवल्या जाणाऱ्या विमानांची संख्या वाढवणार असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे. कारण लसीकरणाचे दोन्ही डोस घेतलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

First published:

Tags: Airplane, Airport, Money