तब्बल 41 वेळा ICICI बँकेला गंडा घालून झाला कोट्यधीश; चोरीचा प्रकार पाहून अधिकारीही चक्रावले

ICICI बँकेच्या मासिक ऑडिटमध्ये तब्बल अडीच कोटींचा घोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.

  • Share this:

गुजरातमधील सूरतमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. येथए खोटं सोनं देऊन 30 ग्राहकांनी 41 वेळा लोन घेतलं. या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर अधिकाऱ्यांना धक्काच बसला. सूरत क्राइम ब्रांचने या प्रकरणाता तपास सुरू केला आहे.

या प्रकरणात सूरत क्राइम ब्रांचने विशाल भरवाड नावाच्या व्यक्तीला अटक केलं आहे. या गुन्हाच्या खुलासाही मोठ्या विचित्र पद्धतीने झाला. ICICI बँकेच्या मासिक ऑडिटमध्ये एकाच ग्राहकाकडून बँकेच्या विविध 3 शाखांमध्ये लोन घेतले असल्याची माहिती समोर आली, त्यानंतर बँकेने आपल्या पद्धतीने तपास सुरू केला.

बँकेच्या तपासानुसार विशाल भरवाड नावाच्या व्यक्तीने आपल्या अन्य 30 साथीदारांसोबत मिळून 10 ऑगस्ट 2020 पासून ते 9 सप्टेंबर 2020 दरम्यान तब्बल 41 वेळा खोटं सोनं देऊन 2.55 कोटी रुपयांचं गोल्ड लोन घेऊन गेले. त्यांनी बँकेच्या 10 शाखांमधून लोन घेतलं होतं.

सूरत शहरातील मोटा वराछा, उत्राण, योगी चौक, सरथाना, कतारगाम आणि पीपलोद क्षेत्रातील शाखांमध्ये हा घोटाळा झाला आहे. या प्रकरणात महिला आणि पुरुषांनी एकमेकांच्या बँकेचा रेफ्रेस देऊन लोन घेतलं होतं. ऑडिट रिपोर्टमध्ये खुलासा झाल्यानंतर त्यांनी सिक्युरिटी म्हणून बँकेला दिलेल्या सोन्याचा तपास केला तेव्हा ते सोन खोटं असल्याचं समोर आलं.

सूरत क्राइम ब्रांचमध्ये 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूरत क्राइम ब्रांचचे एसीपी आर.आर.सरवैया यांनी सांगितले की या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: November 7, 2020, 6:02 PM IST
Tags:

ताज्या बातम्या