नवी दिल्ली, 4 जानेवारी : भारतीय बाजारात सोमवारी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोन्याचा दर 50 हजारांवर गेला आहे. दिल्ली सराफा बाजारात 4 जानेवारी 2021 रोजी सोन्याचा भाव (Gold Price Today) 877 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला आहे. तर चांदीच्या दरात (Silver Price Today) आज 2000 रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. एक किलोग्रॅम चांदी 2,012 रुपयांनी महाग झाली आहे. गेल्या सत्रात दिल्लीत सराफा बाजारात सोन्याचा भाव 49,742 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर चांदी 67,442 रुपये प्रति किलोग्रॅम होती. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपयाच्या तुलनेत डॉलर कमकुवत झाल्याने, आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.
सोन्याच्या नव्या किंमती (Gold Price, 4 January 2021) -
दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव 877 रुपये प्रति 10 ग्रॅमने वाढला. त्यामुळे आता दिल्लीत 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव 50,619 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका आहे. गेल्या आठवड्यात 10 ग्रॅमसाठीचा दर 49,742 इतका होता.
चांदीचा नवा दर (Silver Price, 4 January 2021) -
सोमवारी चांदीच्या दरात मोठी वाढ झाली. दिल्ली सराफा बाजारात चांदीच्या किंमतीत 2,012 रुपये प्रति किलोग्रॅम वाढ झाली. त्यामुळे चांदीचा दर 69,454 रुपये इतका आहे.
एचडीएफसी सिक्योरिटीजचे (HDFC Securities) सीनियर एनालिस्ट तपन पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील चढ-उताराच्या सत्रानंतर, या सत्रात डॉलरमध्ये घसरण झाल्याने, सोन्याचा दर वाढला आहे. आता अनेक गुंतवणूकदार, इतर सर्व गुंतवणूकीच्या पर्यायांमध्ये सोन्याला सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानतात. त्यामुळे सोनं खरेदीत वाढ होत असून दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमतीतही वाढ होत आहे.