सरकारी नोकरी हवी? स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी आहे 'इतक्या' जागांवर भरती

सरकारी नोकरी हवी? स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी आहे 'इतक्या' जागांवर भरती

अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवाराचं कुठेही पोस्टिंग होऊ शकतं. जाणून घ्या या पदासाठी शैक्षणिक पात्रता आणि कामाचं स्वरूप

  • Share this:

मुंबई, 10 जून : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत 384 जागांवर भरती केली जाणार आहे. शहर समन्वयक अशा पदांसाठी महाराष्ट्र सरकारनं अर्ज मागवलेत. अख्ख्या महाराष्ट्रात उमेदवाराचं कुठेही पोस्टिंग होऊ शकतं.

शैक्षणिक पात्रता - या पदासाठी B.E./B.Sc./B.Arch/ B.Planning  यापैकी कोणतीही शैक्षणिक पात्रता हवीय. तसंच मराठी भाषेचं उत्तम ज्ञान हवं. शिवाय नागरी क्षेत्रातला 1 वर्षाचा अनुभव असेल तर प्राधान्य दिलं जाईल.

वयाची अट - 1 जून 2019 रोजी 30 वर्षापर्यंतच्या उमेदवारांनी अर्ज करावा.

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत FD पेक्षा लवकर दुप्पट होतात पैसे, 'अशी' करा गुंतवणूक

अपेक्षित कामाचं स्वरूप - नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे करण्यात येणाऱ्या कामाचं पर्यवेक्षण करणं. ही कामं पुढीलप्रमाणे -

हागणदारीमुक्त शहरासंबंधी कामं, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छ सर्वेक्षण 2020च्या अनुषंगानं कामं, कचरामुक्त शहर अंतर्गत तीन स्टार्स मिळवणं.

Union Budget 2019 : बँकेतून 'इतके' पैसे काढण्यावर लागू शकतो कर

तसंच मुख्याधिकाऱ्यांनी नेमून दिलेली स्वच्छता विभागासंबंधी कामं.

अर्ज आॅनलाइनच करावेत. त्यासाठी http://smmurban.com/ या वेबसाइटवर जा. अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 17 जुलै 2019.

वर्षभर या उत्पादनांना असते मागणी, फक्त 90 हजार रुपयात सुरू करा व्यवसाय

विभागस्तरावर मुलाखत घेऊन उमेदवार निवडले जातील. मुलाखतीची वेळ आणि ठिकाण प्रत्येकाला कळवली जाईल. मुलाखतीला येताना पदवी आणि अनुभवासंबंधीची कागदपत्रं घेऊन यावीत.

या पदासाठी मानधन आहे 30 हजार रुपये. तर गडचिरोलीमधल्या पोस्टिंगसाठी मानधन आहे 35 हजार रुपये.

नियुक्ती पत्र मिळाल्यानंतर उमेदवाराला नोकरीच्या ठिकाणी लगेच रुजू व्हावं लागेल.

क्रिकेटला गुड बाय करताना 'फायटर' युवराजच्या डोळ्यांत अश्रू , पाहा VIDEO

First published: June 10, 2019, 3:47 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading