कमी दरात धान्य मिळवण्यासाठी आहेत फक्त 2 दिवस! लगेच करा हे काम नाहीतर होईल नुकसान

कमी दरात धान्य मिळवण्यासाठी आहेत फक्त 2 दिवस! लगेच करा हे काम नाहीतर होईल नुकसान

कोरोनाच्या संकटात सरकार देत आहे स्वस्त धान्य, त्यासाठी आजच करा हे काम.

  • Share this:

नवी दिल्ली, 28 सप्टेंबर : केंद्र सरकारने 'वन नेशन-वन राशन कार्ड' (One Nation-One Ration Card) योजना लागू केली आहे. यामधून आपल्या रेशनकार्डवर देशाच्या कोणत्याही भागात राहणारी कोणतीही व्यक्ती सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे (PDS) स्वस्त दरात धान्य मिळवू शकते. मात्र यासाठी आपल्या रेशनकार्डला आपल्या आधार कार्डशी लिंक करणं आवश्यक आहे. आधार कार्डला रेशल कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2020 आहे, म्हणजे या कामासाठी तुमच्याकडे फक्त दोन दिवस शिल्लक आहेत.

केंद्राने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सूचना दिल्या

ठरलेल्या वेळात जर तुम्हाला रेशनकार्ड आधार कार्डशी लिंक करता आले नाही तर पीडीएस कडून तुम्हाला फक्त 30 सप्टेंबर पर्यंत धान्य मिळेल. म्हणूनच, आपल्या रेशनकार्डला त्वरित आधार कार्डशी लिंक करा. केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, खर्‍या लाभार्थींनी आधार लिंक न केल्यास त्यांना धान्य देऊ नका. त्यांचे नाव किंवा रेशन कार्ड पीडीएसमधून काढले जाऊ शकत नाही.

वाचा-SBI देत आहे अत्यंत कमी दरात घर घेण्याची सुवर्णसंधी, असा घ्या या मेगा लिलावात भाग

असं ऑनलाइन लिंक करा आधार कार्ड

>> आधार लिंकिंगसाठी अधिकृत वेबसाइटवर जा आणि स्टार्ट नाऊ वर क्लिक करा. यानंतर, आपल्या पत्त्याशी संबंधित तपशील टाका.

>> बेनिफिट प्रकारात 'रेशन कार्ड' चा पर्याय निवडा. यानंतर तुमच्या रेशनकार्डमध्ये दिलेली योजना निवडा.

>> ओटीपी पडताळणीनंतर तुमच्या रेशनकार्डला तुमच्या आधारशी लिंक केले जाईल.

वाचा-बँकेत एकही रुपया नसला तरी देखील गरजेसाठी काढता येतील पैसे, या बँकेची खास योजना

असे ऑफलाइन लिंक करा आधार कार्ड

>> जवळच्या पीडीएस केंद्र किंवा पीडीएस शॉपला भेट द्या. आधार कार्डची फोटो कॉपी, घर प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे शिधा कार्ड घ्या.

>> जर तुमचे बँक खाते तुमच्या आधारशी लिंक केलेले नसेल तर तुम्हाला तुमच्या बँक पासबुकची छायाचित्रही द्यावी लागेल.

>> हे सर्व कागदपत्रे पीडीएस केंद्रात आपल्या आधारच्या फोटोसह सबमिट करा. सर्व कागदपत्रे स्वीकारल्यानंतर आपल्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस पाठविला जाईल.

>> एकदा आधार कार्ड आणि रेशनकार्ड लिंक झाल्यावर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर एसएमएस येईल.

Published by: Priyanka Gawde
First published: September 28, 2020, 7:09 AM IST

ताज्या बातम्या