Home /News /money /

Investment Tips: स्वत:चं नुकसान करु नका; गुंतवणुकीबाबत तीन मोलाचे सल्ले लक्षात ठेवा

Investment Tips: स्वत:चं नुकसान करु नका; गुंतवणुकीबाबत तीन मोलाचे सल्ले लक्षात ठेवा

Investment Tips: प्रसिद्ध यूट्युबर आणि फायनान्शियल एक्सपर्ट रचना रानडे यांनी गुंतवणुकीबाबत काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत त्यावर एक नजर टाकूया.

    मुंबई, 26 जून : गुंतवणुकीबाबत आजही अनेकांनी अडचण होते. योग्य माहिती नसल्याने अनेकांना नुकसानही सहन करावं लागतं. मात्र आता गुंतवणुकीचे मोफत सल्ले सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळतात. अनेक एक्सपर्ट्स आपल्या अभ्यासाचा वापर करुन लोकांना सोशल मीडियावर सल्ले देतात. प्रसिद्ध यूट्युबर आणि फायनान्शियल एक्सपर्ट रचना रानडे यांनी गुंतवणुकीबाबत काही महत्त्वाचे सल्ले किंवा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभव सर्वासोबत शेअर केला आहे, त्यावर एक नजर टाकूया. क्वान्टिटी पेक्षा क्वालिटीवर लक्ष द्या रचना रानडे यांनी यासाठी त्यांचं स्वत:चं उदाहरण दिलं. 2006 त्यांनी अनेक स्वस्त स्टॉक्समध्ये काही गुंतवणूक केली होती. त्यावेळी महाग स्टॉक घेण्यापेक्षा स्वस्तातले जास्त घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला.  मात्र 2008 च्या मार्केट क्रॅशमध्ये त्यांचा पोर्टफोलियो अक्षरश: रिकामा झाला होता. त्यांचं त्यावेळी 90 टक्के नुकसान झालं होतं. मात्र त्यावेळी स्टॉकच्या क्वॉन्टिटी ऐवजी क्वॉलिटीवर लक्ष दिलं असतं तर परिस्थिती वेगळी असती असं त्या सांगतात. तीन 'C' गुंतवणुकीच्या वेळी Confidence, Courage आणि Consistency हे तीन 'C' खुप मदत करतात असं रानडे सांगतात. कॉन्फिडन्स हा रिसर्चमधून येतो. त्यामुळे चांगल्या शेअरमध्ये गुंतवणूक करतात त्याबाबत मजबूत रिसर्च करा. हिंमत (Courage) देखील गुंतवणुकीदरम्यान मोठी भूमिका बजावते. जसं की सध्या मार्केटमध्ये घसरण सुरु आहे आणि अनेकांचं पोर्टफोलिओही खाली येत आहे. अशावेळी आपल्या स्टॉकबाबतचा विश्वास डगमगतो. मात्र तुमचा रिसर्च योग्य असेल तर तुमच्या शेअर होल्ड करण्याची हिंमत येते. तिसरा C म्हणजे कन्सिस्टन्सी. जर तुम्ही गुंतवणुकीबाबत सिस्टमॅटिक दृष्टिकोन ठेवून गुंतवणुकीत कन्सिस्टन्सी ठेवली तर तुम्ही तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासात यशस्वी व्हाल. कन्फर्ट झोनमधून बाहेर पडावं लागेल आपण सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोनं, एफडी हे पर्याय निवडतो. या पलिकडेही गुंतवणुकीचे अनेक पर्यात आहे. शेअर बाजारही त्यापैकीच एक आहे. शेअर बाजारात रिस्क आहे पण योग्य रिसर्च आणि स्टडी केला तर त्यात गुंतवणूक करुन चांगली रिटर्न मिळवता येतात असं रचना रानडे सांगतात.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, Money

    पुढील बातम्या