नोटबंदीची 3 वर्षं : 2 हजार रुपयांच्या नोटांबद्दलची सगळ्यात मोठी बातमी

नोटबंदीची 3 वर्षं : 2 हजार रुपयांच्या नोटांबद्दलची सगळ्यात मोठी बातमी

मोदी सरकारने 3 वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय घेत 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. त्यानंतर 500 च्या नव्या नोटा छापण्यासोबतच 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या. सध्या 2 हजार रुपयांच्या नोटांचं चलनातलं प्रमाण कमी आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 8 नोव्हेंबर : मोदी सरकारने घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला 3 वर्षं झाली आहेत. त्याचवेळी 2 हजार रुपयांच्या नोटा बाजारातून हटवण्यात येतील, असा प्रस्ताव भारताच्या आर्थिक विभागाचे माजी सचिव एस.सी. गर्ग यांनी दिला आहे. याआधीच लोकांनी 2 हजार रुपयांच्या नोटा जमा केल्या आहेत. त्यामुळे सध्या या नोटा मोठ्या प्रमाणात चलनात नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

सुभाष गर्ग यांनी कंपन्यांचं राष्ट्रीयीकरण बंद करून खाजगीकरणाला प्रोत्साहन देण्याचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाहेर आणण्याचाही प्रस्ताव त्यांनी दिलाय.

नोटबंदीमध्ये 1 हजार रुपयांची नोट रद्द

मोदी सरकारने 3 वर्षांपूर्वी नोटबंदीचा निर्णय घेत 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्या होत्या. त्यानंतर 500 च्या नव्या नोटा छापण्यासोबतच 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या. सध्या 2 हजार रुपयांच्या नोटांचं चलनातलं प्रमाण कमी आहे. व्यवहारासाठी या नोटा फारशा वापरल्या जात नाहीत. त्यामुळेच फारसा कुणाला त्रास न होता या नोटा चलनाबाहेर आणता येतील, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

(हेही वाचा : 'मी ईश्वरसाक्ष शपथ घेतो की...' शिवसेनेची आधीच बॅनरबाजी सुरू)

नोटबंदीनंतर 2 हजार रुपयांच्या नोटा चलनात आणल्या गेल्या पण या नोटांना त्यावेळीही विरोध झाला होता. ही नोट वापरण्यात व्यवहारिक कारणांमुळे अडचणी येत होत्या. त्यामुळे या नोटा चलनातून बाहेर जाणार असतील तर सगळ्यांनाच दिलासा मिळणार आहे.

=========================================================================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2019 09:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading