तुमच्या खिशातली 2 हजाराची नोट पाकिस्तानमधून तर आली नाही ना? अशी ओळखा नकली नोट

तुमच्या खिशातली 2 हजाराची नोट पाकिस्तानमधून तर आली नाही ना? अशी ओळखा नकली नोट

तुमच्याकडे जर 2 हजार किंवा 500 च्या नोटा असतील तर त्या असली आहेत की नकली हे ओळखण्याच्या काही युक्त्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 14 ऑक्टोबर : भारतात पुन्हा एकदा पाकिस्तानातून नकली नोटा आल्या आहेत, असं NIA ने म्हटलं आहे. त्यामुळे नोटांबद्दल खबरदारी घ्यावी लागणार आहे. तुमच्याकडे जर 2 हजार किंवा 500 च्या नोटा असतील तर त्या असली आहेत की नकली हे ओळखण्याच्या काही युक्त्या आहेत.

2 हजार रुपयांच्या नोटेचा मूळ रंग मजेंटा आहे. याचा आकार 66 मिमी X 166 मिमी असतो. या नोटेवर महात्मा गांधींचा फोटो असतो तर नोटेच्या मागे मंगळयानाचा.

1. ही नोट प्रकाशात धरली तर 2000 असं लिहिलेलं असेल.

2. ही नोट डोळ्यासमोर 45 अंशांच्या कोनात धरली तरी 2000 असं लिहिलेलं दिसेल.

3. देवनागरीमध्ये 2000 असं लिहिलेलं असेल.

4. नोटेच्या मध्यभागी महात्मा गांधींचा फोटो आहे.

5. नोटेवर छोट्याछोट्या अक्षरांत RBI आणि 2000 लिहिलेलं असेल.

6. नोटेमध्ये सिक्युरिटी थ्रेड आहे. त्यावर RBI आणि 2000 लिहिलं आहे.

7. गॅरंटी क्लॉज, गव्हर्नरची सही, प्रॉमिस क्लॉज आणि RBI चा लोगो उजव्या बाजूला आहे.

8. नोटेवर महात्मा गांधींचा फोटो आणि इलेक्ट्रोटाइप वॉटरमार्क आहे.

9. नोटेच्या वरच्या बाजूला सगळ्यात डावीकडे आणि खाली सगळ्यात उजवीकडे लिहिलेले नंबर डावीकडून उजवीकडे मोठे होत जातात.

10. इथे लिहिलेला नंबर 2000 चा रंग बदलतो. त्याचा रंग हिरव्याहून निळा होत जातो.

(हेही वाचा : आईवडिलांनी काढलं घराबाहेर पण आता तो होणार देशातला पहिला समलिंगी पायलट)

11. डावीकडे अशोकस्तंभ आहे.

12. उजवीकडे एका आयाताकार बॉक्समध्ये 2000 असं लिहिलेलं असतं.

13. नोटेच्या उजव्या बाजूला काही रेषा असतात.

14. नोटेच्या मागच्या बाजूला प्रिटिंगचं वर्ष लिहिलेलं असतं.

15.. स्वच्छ भारतचा लोगो आणि बोधवाक्यही असतं.

16. नोटेच्या मध्यभागी भाषेचं पॅनल असतं.

17. मंगळयानाचं चित्र

==========================================================================

बाळासाहेबांच्या विचारांचा नातवाला विसर? आदित्य ठाकरेंचा पाहा हा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: October 15, 2019, 5:41 PM IST

ताज्या बातम्या