आतापर्यंत 20 कंपन्यांना मिळाली परवानगी गेल्या वर्षी 13 कंपन्यांना ड्रोनमधून सप्लाय करण्याची परवानगी मिळाली होती. या कंपन्यांपूर्वी स्पाइसजेटची (SpiceJet) डिलिव्हरी विंग असणाऱ्या स्पाइसएक्सप्रेसला (SpiceXpress) डीजीसीएने आधी मान्यता दिली होती. यासह आतापर्यंत एकूण 20 कंपन्यांना अशी परवानगी देण्यात आली आहे. (हे वाचा-LIC ची पॉलिसीधारकांसाठी Good News! बंद पडलेली पॉलिसी पुन्हा सुरू करता येणार) मे मध्ये डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हील एव्हिएशन (डीजीसीए) ने ड्रोनच्या माध्यमातून ई-कॉमर्स पार्सल डिलिव्हरीला स्पाइसजेट कंपनीची मालवाहू युनिट स्पाइसएक्सप्रेसला परवानगी दिली होती. डीजीसीएने दिलेल्या या मंजुरीनंतर आता स्पाइसजेट ड्रोनच्या मदतीने ई-कॉमर्स पार्सल, मेडिकल, फार्मा आणि इतर आवश्यक वस्तू पुरवण्यास सक्षम असेल. दुर्गम भागात या गोष्टी पोहोचवणे शक्य आहे. BVLOS म्हणजे काय? ड्रोन इंडस्ट्रीमध्ये (Drone Industry) BVLOS ची चर्चा असते. जगातील अनेक देश त्यांच्या ड्रोन पॉलिसीमध्ये सुधारणा करत आहेत जेणेकरुन मानव रहित एरिअल व्हेइकल्स (UAV's) जास्तीत जास्त कार्यक्षमतेने उड्डाण करू शकतील. BVLOS फ्लाइट्सना व्हिज्युअल रेंजच्या पलीकडे देखील उडवता येते. यामुळे ड्रोन्सना जास्त अतंरापर्यंत जाण्यास मदत मिळेल. आर्थिकदृष्ट्या देखील ही सुविधा परवडणारी आहे.#AwaazStory | आने वाले दिनों में #Pizza से लेकर #Vaccine तक की डिलीवरी #drone से हो सकती है। इसके लिए कुछ कंपनियों को @MoCA_GoI से इजाजत दी गई है। पूरी खबर जानिए @rohan18april से | pic.twitter.com/zsGCyugoM0
— CNBC-AWAAZ (@CNBC_Awaaz) January 8, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Money