सावधान! 31 डिसेंबरपासून बंद होणार 2 हजारांची नोट? जाणून घ्या काय आहे सत्य

सावधान! 31 डिसेंबरपासून बंद होणार 2 हजारांची नोट? जाणून घ्या काय आहे सत्य

नोटाबंदीनंतर आता मोदी सरकार घेणार 2000च्या नोटा बंद करण्याचा निर्णय?

  • Share this:

नवी दिल्ली, 08 डिसेंबर : नोव्हेंबर 2016मध्ये मोदी सरकरानं नोटाबंदीचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर 500 आणि 1000च्या नोटांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र आता सरकारच्या वतीनं 31 डिसेंबरपासून 2 हजाराच्या गुलाबी नोटा बंद होणार असल्याचे मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नोटाबंदीनंतर 500 आणि 1 हजाराच्या नोटा बंद करून 2 हजाराची एक नोटी जारी करण्यात आली होती. मात्र आता 2 हजारच्या नोटा बंद होणार असल्याच्या अफवा सध्या पसरवल्या जात आहेत. दरम्यान यात काहीही तथ्य नाही आहे. दोन हजाराची नोट बंद होऊन पुन्हा एक हजाराची नोट बाजारात येणार आहे, अशा गेल्या काही दिवसांपासून पसरवल्या जात आहेत. जाणून घ्या काय आहे तथ्य...

असा मेसेज होत आहे व्हायरल

सध्या सोशल मीडियावर '31 डिसेंबर 2019नंतर 2 हजार रुपयाची नोट वापरली जाणार नाही आहे’ अशा मजकूरासह एक लिंकही व्हायरल केली जात आहे.

वाचा-31 डिसेंबरपर्यंत हे काम केलं नाहीत तर तुमचं पॅन कार्ड ठरेल बेकायदेशीर

वाचा-2 लाख रुपयांत सुरू करा बिझनेस, मोदी सरकार करणार मदत

काय आहे सत्य

न्यूज 18नं केलेल्या फॅक्ट चेकनुसार, सरकारच्या वतीनं कुठेही असे म्हटले नाही आहे की 2 हजारांची नोट बंद केली जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये, एसबीआय बॅकेंच्या एटीएममधून 2 हाजारांच्या नोटा काढता येणार नाही. त्याच्या जागी 500, 100, 200 रुपयांच्या नोटा येणार, अशा बातम्या प्रसिध्द झाल्या होत्या. मात्र रिझर्व्ह बॅकेन दिलेल्या माहितीनुसार असे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. त्यामुळं 2 हजारांच्या नोटा बंद करण्यात येणार असल्याच्या सर्व अफवा आहेत.

वाचा-रोज 3 रुपये खर्च करा आणि तुमचं बँक अकाउंट फ्रॉडपासून वाचवा

याआधी सरकारनं 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा सरकारचा विचार होता. या निर्णयामुळेच या नोटांची साठेबाजी करण्याचे प्रकार वाढलेत. 2 हजार रुपयांच्या रूपात काळा पैसा साठवण्याचा धोका आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले होते. मात्र अद्याप या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलेला नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 8, 2019 03:52 PM IST

ताज्या बातम्या