2 हजार रुपयांच्या नोटांची साठेबाजी रोखण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न, या 5 गोष्टी करणार

2 हजार रुपयांच्या नोटांची साठेबाजी रोखण्याचे मोदी सरकारचे प्रयत्न, या 5 गोष्टी करणार

2 हजार रुपयांच्या रूपात काळा पैसा साठवण्याचा धोका आहे. हे रोखण्यासाठी सरकारने विशेष तरतुदी केल्या आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर : 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा सरकारचा विचार आहे. या निर्णयामुळेच या नोटांची साठेबाजी करण्याचे प्रकार वाढलेत. 2 हजार रुपयांच्या रूपात काळा पैसा साठवण्याचा धोका आहे, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं. खासदार डॉ. एल. हनुमंतय्या यांनी संसदेत याबद्दल सवाल उपस्थित केला. सरकारने जास्त किंमतीच्या नोटांची साठेबाजी रोखण्यासाठी काय केलं, असं त्यांनी विचारलं. त्यावर निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं. त्या म्हणाल्या, ही साठेबाजी आता कमी होऊ शकते.

2017-18, 2018-19 या आर्थिक वर्षांत काळ्या पैशाच्या साठेबाजीचं प्रमाण कमी झालंय. त्याचबरोबर हे सरकार असे प्रकार रोखण्यासाठी प्रयत्न करतंय, हेही त्यांनी सांगितलं.

1. डिजिटल पेमेंट गरजेचं

सरकारने 1 नोव्हेंबर 2019 पासून मोठा बदल केला आहे. हा नियम 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी हा नियम आहे. या नव्या नियमांनुसार, व्यापाऱ्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पेमेंट करावं लागणार आहे. त्यावर कोणताही चार्ज द्यावा लागणार नाही.

2. कॅश काढली की टॅक्स

एक वर्षात एका बँक खात्यातून 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम काढली तर 2 टक्के TDS लागेल. या आर्थिक वर्षात 31 ऑगस्ट 2019 पर्यंत ज्या लोकांनी एक कोटी रुपये काढले आहेत त्यांना पैसे काढायचे असतील तर त्यासाठी 2 टक्के TDS लावला जाईल.

(हेही वाचा : अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का, 8 प्रमुख उद्योगांमध्ये झाली घट)

3. कॅशमध्ये पेमेंट करायचं असेल तर ....

कुणाला कॅशमध्ये पेमेंट करायचं असेल तर कॅश पेमेंटसाठी एक मर्यादा ठरवण्यात आली आहे. वैयक्तिक खर्चासाठी 2 लाख रपये तर बिझनेससाठी 10 हजार रुपयांची मर्यादा आहे.

4. दानाची मर्यादा ठरवली

धार्मिक संघटनांना दिल्या जाणाऱ्या दानाची मर्यादा 10 हजारांवरून 2 हजार रुपयांवर आणली आहे.

5. कर्जाची मर्यादा ठरली

जर कुणी तुम्हाला थेट तुमच्या खात्यात पैसे पाठवले तर ती रक्कम 20 हजार रुपये आहे. यापेक्षा जास्त कॅश लोन दिलं तर 100 टक्के पेनल्टी द्यावी लागेल.

=============================================================================================

First published: November 30, 2019, 5:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading