थॉमस कुक ट्रॅव्हल कंपनी एका रात्रीत बंद, 6 लाख पर्यटक अडकले

थॉमस कुक ट्रॅव्हल कंपनी एका रात्रीत बंद, 6 लाख पर्यटक अडकले

जे पर्यटक सध्या थॉमस कुकसोबत टूरवर गेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी यूकेच्या नागरी उड्डाण प्राधिकरणातर्फे प्रयत्न केले जातील. 23 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या काळात या पर्यटकांसाठी बचावमोहीम आखण्यात आली आहे.

  • Share this:

लंडन, 23 सप्टेंबर : जगातली सर्वात मोठी ट्रॅव्हल कंपनी थॉमस कुक (युके) रविवारी अचानक बंद करण्यात आली. 178 वर्षं जुनी असलेल्या या ब्रिटिश कंपनीकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

याआधी थॉमस कुक ही कंपनी बँकांकडे वाढीव निधी मागत होती पण त्याला मंजुरी मिळाली नाही. कंपनी बंद करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नव्हता,असं थॉमस कुकने काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे. कंपनी बंद पडल्यामुळे 22 हजार लोकांच्या नोकरीवर गदा आली आहे. यातले 9 हजार कर्मचारी यूकेमधले आहेत.

कंपनी बंद पडल्याबद्दल मागितली माफी

कंपनीचे ग्राहक, पुरवठादार आणि भागीदार या सगळ्यांवरच याचा परिणाम होणार आहे. थॉमस कुकचे चीफ एक्झिक्युटिव्ह पीटर फँकहॉजर यांनी याबद्दल माफी मागितली आहे. थॉमस कुक कंपनीची सगळी बुकिंग्ज रद्द करण्यात आली आहेत.

...तर खात्यावर दररोज जमा होतील 100 रुपये, RBI चा नवा नियम वाचलात का?

जे पर्यटक थॉमस कुकसोबत टूरवर गेले आहेत त्यांना परत आणण्यासाठी यूकेच्या नागरी उड्डाण प्राधिकरणातर्फे प्रयत्न केले जातील. 23 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर या काळात या पर्यटकांना परत आणलं जाणार आहे.

थॉमस कुक बंद झाल्यामुळे ब्रिटनच्या सर्वात जुन्या कंपन्यांपैकी एक असलेल्या कंपनीचा अंत झाला आहे. ही कंपनी वर्षभरात एक कोटी 90 लाख लोकांसाठी हॉटेल, रिसॉर्ट आणि एअरलाइन चालवत होती.

========================================================================================

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्युस्टनमधील भाषणाचा संपादित भाग, पाहा VIDEO

Published by: Arti Kulkarni
First published: September 23, 2019, 5:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading