मुंबई, 11 जून : तुम्ही वैद्यकीय क्षेत्रात आहात? नोकरीच्या शोधात आहात? तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. नवी मुंबई महानगरपालिकेत 169 पदांवर भरती करायची आहे. वैद्यकीय तज्ज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी अशा पदांसाठी अर्ज मागवले आहेत.
वैद्यकीय तज्ज्ञ या पदासाठी 8 जागा आहेत तर वैद्यकीय अधिकारी या पदासाठी 161 जागा आहेत.
खुशखबर, आता झीरो बॅलन्स खातेधारकांसाठी चेकबुक आणि ATM कार्ड मोफत
शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय तज्ज्ञ पदासाठी D.M./M.C.H./M.S./M.C.H./ DNB यापैकी एक शैक्षणिक पात्रता हवी.
वैद्यकीय अधिकारी पदासाठी M.D./ M.S./ B.D.S./MBBS/DM यापैकी एक शैक्षणिक पात्रता हवी.
कोकण किनारपट्टीसह गोव्यात हाय अलर्ट, समुद्रकिनाऱ्यांवर न जाण्याचं आवाहन
वयाची अट
1 जुलै 2019 रोजी 38 वर्षापर्यंत वय असलेले अर्ज करू शकतात. मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट आहे.
अर्जाची फी
उमेदवाराला 300 रुपये अर्जाची फी द्यावी लागेल. मागासवर्गीयांसाठी ही फी 150 रुपये आहे.
नोकरीचं ठिकाण नवी मुंबई आहे.
अखेर पावसामुळं दक्षिण आफ्रिकेनं उघडले खाते, भारत तिसऱ्या क्रमांकावर
अर्ज पाठवण्याचा पत्ता
प्रशासन विभाग, आस्थापना शाखा क्र.1, तिसरा मजला, नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालय, भू.क्र.1, किल्ले गावठाण जवळ, पामबीच जंक्शन, सेक्टर 15 A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई – 400614 किंवा ईमेल: healthrecruitment_2019@nmmconline.com
अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख 1 जुलै 2019. शिवाय तुम्ही https://www.nmmc.gov.in/navimumbai/ या वेबसाइटवर अधिक माहिती मिळवू शकता.
वैद्यकीय व्यवसायात बऱ्याच संधी असतात. सगळेच जण काही स्वत:ची डिस्पेन्सरी उघडू शकत नाहीत. असे डाॅक्टर्स उमेदीच्या काळात पालिकेच्या हाॅस्पिटलमध्ये काम करू शकतात.त्यामुळे त्यांना अनुभवही मिळतो. तिथे डाॅक्टर्सची जास्त गरज असते. अशा नोकऱ्यांमध्ये करियरची उत्तम संधी मिळते.
जवानांनी मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, VIDEO समोर