• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • Petrol-Diesel Price Today: ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत 16 वेळा इंधन दरवाढ, आज पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल

Petrol-Diesel Price Today: ऑक्टोबरमध्ये आतापर्यंत 16 वेळा इंधन दरवाढ, आज पुन्हा महागलं पेट्रोल-डिझेल

आज 21 ऑक्टोबर गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price Today) वाढल्या आहेत. पेट्रोल 35 पैसे, तर डिझेलही 35 पैशांनी महागलं आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर : पेट्रोल-डिझेलचे दर सतत वाढत आहेत. त्यामुळे देशातील सर्वच शहरांत पेट्रोल ऑल टाइम हायवर आहे. आज 21 ऑक्टोबर गुरुवारी पुन्हा एकदा पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price Today) वाढल्या आहेत. पेट्रोल 35 पैसे, तर डिझेलही 35 पैशांनी महागलं आहे. काल मंगळवारीही पेट्रोल-डिझेलचे दर 35 पैशांनी वाढले होते. ऑक्टोबर महिन्यात इंधन दरात 5 रुपयांहून अधिकची वाढ झाली आहे. ऑक्टोबरमध्ये 5 रुपयांहून अधिक वाढले इंधन दर - ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 16 वेळा इंधन दरात वाढ करण्यात आली आहे. केवळ चार दिवस सोडून दररोज पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. केवळ ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल 4.80 रुपये महागलं आहे. तर डिझेल 5 रुपयांनी वाढलं आहे. कच्च्या तेलाच्या दरात तेजी आहे, त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरवाढ कायम आहे.

    EPFO: PF Account चे हे 6 फायदे तुम्हाला माहित आहेत का? सहज मिळवता येईल लाभ

    चार महानगरात पेट्रोल डिझेल भाव (Petrol Diesel Price on 21 October 2021) - >> दिल्लीत पेट्रोल 106.54 रुपये आणि डिझेल 95.27 रुपये प्रति लीटर >> मुंबईत पेट्रोल 112.44 रुपये आणि डिझेल 103.26 रुपये प्रति लीटर >> चेन्नईमध्ये पेट्रोल 103.61 रुपये आणि डिझेल 99.59 रुपये प्रति लीटर >> कोलकातामध्ये पेट्रोल 107.11 रुपये आणि डिझेल 98.38 रुपये प्रति लीटर

    अवघ्या 1 रुपयात घेता येईल Digital Gold! जाणून घ्या कशी कराल खरेदी

    देशातील तीन ऑईल मार्केटिंग कंपन्या HPCL, BPCL आणि IOC रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर करतात. तसंच मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Karishma
    First published: