ONGC मध्ये 107 पदांवर व्हेकन्सी, अर्ज करायची आज आहे शेवटची तारीख

ONGC मध्ये 107 पदांवर व्हेकन्सी, अर्ज करायची आज आहे शेवटची तारीख

ऑइल अँड नॅचरल गॅस काॅर्पोरेशन लिमिटेड ( ONGC )नं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय

  • Share this:

मुंबई, 18 जून : ऑइल अँड नॅचरल गॅस काॅर्पोरेशन लिमिटेड ( ONGC )नं नोटिफिकेशन प्रसिद्ध केलंय. त्यात मेडिकल अधिकारी आणि इतर पदांवर भरती करायची आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट ongcindia.com वर जाऊन अर्ज करावा. आजच शेवटची तारीख आहे. 42 मेडिकल ऑफिसर्स, 24 सिक्युरिटी ऑफिसर्स, 31 फायनान्स आणि एन्कांउटर ऑफिसर्स, 1 पर्यावरण आणि 9 फायर ऑफिसर्ससाठी जागा भरायच्या आहेत.

शैक्षणिक योग्यता

मेडिकल ऑफिसर - MBBS आणि कमीत कमी 1 वर्षाचा अनुभव

सिक्युरिटी ऑफिसर - पोस्ट ग्रॅज्युएट आणि सेंट्रल पोलीस आॅर्गनायझेशन किंवा सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स इथे 2 वर्षांचा अनुभव

आर्थिक गुंतवणुकीत स्त्री पुरुषापेक्षा कशी असते वेगळी?

फायनान्स  अँड अकाउंट ऑफिसर - उमेदवार ग्रॅज्युएट हवा, फायनान्समध्ये 60 टक्के हवेत. शिवाय ICWA/CA किंवा MBA हवा.

AEE (पर्यावरण ) - पर्यावरण इंजिनियरिंग किंवा पर्यावरण विज्ञानात 60 टक्के आणि पदवी

बँकांमध्ये नोकरीची मोठी संधी, 'असा' करा अर्ज

फायर ऑफिसर - फायर इंजिनियरिंगमध्ये 60 टक्के आणि ग्रॅज्युएट

एक्झिक्युटिव्ह पद - B.Tech/B.E, पोस्‍ट ग्रॅजुएट, CA, ICWA, MBA/PGDM, M.E/M.Tech, PG डिप्‍लोमा, MBBS

ONGC Recruitment 2019: संचालक पद

CNG कार्सवरचा GST होऊ शकतो कमी, कारण...

ONGC 2019 भरती नोटिफिकेशनप्रमाणे संचालक पदांसाठी अर्जाची शेवटची तारीख आहे 24 जून.

योग्यता - B.Tech/B.E, M.E/M.Tech, MBA/PGDM

पोस्टिंग - नवी दिल्ली

पदं - 1

अर्जाची शेवटची तारीख - 24 जून 2019

एक्झिक्युटिव्ह पद सोडलं तर बाकीच्या पदांसाठी तुम्हाला आजच Online अर्ज करावा लागेल. त्यासाठी ongcindia.com वर जा आणि अर्ज करा.


VIDEO : वटपौर्णिमेला महिला करत होत्या पूजा, अचानक झाडाला लागली आग!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: ongc
First Published: Jun 18, 2019 07:51 PM IST

ताज्या बातम्या