बदलापूर, 14 जून : नेत्याच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अन्न वाटप, गरजुंना मदत असे अनेक उपक्रम राबवले जातात. मात्र राजकीय नेते आता चक्क पेट्रोल वाटपकडे वळलेले दिसून येत आहेत. शिवसेने पाठोपाठ मनसेने देखील राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त आज बदलापूर येथे 53 रुपये लिटर दराने पेट्रोलचं वाटप केलं आहे.
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त डोंबिवलीत शिवसेनेतर्फे 1 रुपये दराने पेट्रोल दिलं होतं. त्यामुळे इथे अक्षरशः पेट्रोल भरण्यासाठी झुंबड उडाली होती. तर अंबरनाथमध्ये देखील शिवसेनेने 50 रुपये लिटर पेट्रोल वाटप हा उपक्रम राबवला होता. पेट्रोलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना थोडा फार का होईना यामुळे दिलासा मिळाला, असं म्हटलं जात आहे. तर या माध्यमातून शिवसेनेने इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन करीत केंद्र सरकारकडे लक्ष केले आहे.
राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त आज बदलापूर येथे 53 रुपये लिटर दराने पेट्रोलचं वाटप केलं आहे. pic.twitter.com/GxzHmbwb7T
— News18Lokmat (@News18lokmat) June 14, 2021
हे ही वाचा-आज डोंबिवलीत 1 रुपया प्रतिलिटर मिळणार पेट्रोल, जाणून घ्या कसं?
दरम्यान त्या पाठोपाठ आज सायंकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त मनसेने देखील सेनेचा कित्ता गिरवत बदलापूर पूर्वेकडील कात्रप येथील पेट्रोल पंपावर 53 रुपये दराने एक लिटर पेट्रोल दिले. पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी मनसेने केंद्र सरकारने पेट्रोलचे दर कमी करावेत अशी मागणी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Badlapur, Petrol, Petrol and diesel price