Home /News /money /

घरात 100 हून अधिक झुरळे असणाऱ्यांना 'ही' कंपनी देते दीड लाख रुपये, काय आहे कारण?

घरात 100 हून अधिक झुरळे असणाऱ्यांना 'ही' कंपनी देते दीड लाख रुपये, काय आहे कारण?

नॉर्थ कॅरोलिनास्थित कंपनी द पेस्ट इन्फॉर्मर त्या घरांना $2,000 (सुमारे 1.50 लाख रुपये) देत आहे, ज्यात किमान 100 झुरळे आहेत. ही विचित्र ऑफर ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

    मुंबई, 27 जून : अनेकांच्या घरात झुरळं आढळून येतात, ही सामान्य बाब आहे. मात्र एका कंपनीने घरात 100 हून अधिक झुरळं (Cockroaches) असलेल्यांना भन्नाट ऑफर दिली आहे. अमेरिकेतील (America) एका कंपनीने लोकांना ऑफर दिली आहे. लोकांना या बदल्यात लाखो रुपयेही मिळणार आहेत. या ऑफरची सध्या जगभरात चर्चा होत आहे. नॉर्थ कॅरोलिनास्थित कंपनी द पेस्ट इन्फॉर्मर त्या घरांना $2,000 (सुमारे 1.50 लाख रुपये) देत आहे, ज्यात किमान 100 झुरळे आहेत. ही विचित्र ऑफर ऐकून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नॉर्थ कॅरोलिना स्थित पेस्ट कंट्रोल कंपनी आपल्या नवीन कीटक नियंत्रण औषधावर संशोधन करत आहे. अशा स्थितीत त्यांना एकाच वेळी अनेक झुरळांची गरज असते. ज्याच्यावर ते प्रयोग करुन पाहू शकतात. आता कंपनी देशभरात अशा कुटुंबांचा शोध घेत आहे ज्याच्या घरात किमान 100 झुरळे आहेत किंवा सोडता येतील. Viral Video : गर्लफ्रेंडला डोंगरावरुन ढकललं, उंचावरुन पडतानाही प्रियकराला ओरडून म्हणाली... कंपनी या झुरळांवर सतत नजर ठेवणार आहे. ही कंपनी कीटकांना नष्ट करण्यासाठी औषध पुरवते, त्यामुळे ते अशी जागा शोधत आहे. अशा 5 ते 7 कुटुंबांचा कंपनी शोध घेत आहे जिथे झुरळांना ठेवले जाऊ शकते. त्यानंतर या कीटकांवर कंपनी विशेष कीटक नियंत्रण टेक्निक वापरेल. या अभ्यासाद्वारे, नवीन टेक्निकचा झुरळांवर किती परिणाम होतो हे पाहिले जाईल. कंपनीच्या संशोधनासाठी कोणते कुटुंब आपले घर देईल. कंपनी त्याच्या घरात 100 अमेरिकन झुरळे सोडणार आहे. संशोधन कंपनीचे हे संशोधन महिनाभर चालणार आहे. ऐकावं ते नवल! 8 ग्रॅम कमी झालं समोश्याचं वजन म्हणून प्रशासनाने सील केलं दुकान या काळात घरात असलेली सर्व झुरळं नष्ट झाली तर ठीक आहे, नाहीतर संशोधन पूर्ण झाल्यानंतर कंपनी स्वतः औषधांच्या मदतीने उरलेली झुरळं नष्ट करेल. तुमचे घर पुन्हा झुरळमुक्त होईल. मात्र, या संशोधनासाठी जी काही घरे असतील, ती अमेरिकेतच असावीत, अशी कंपनीची अट आहे. संशोधनासाठी घरमालकाला लेखी परवानगी द्यावी लागेल.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: America

    पुढील बातम्या