10वी उत्तीर्ण असलेले घेऊ शकतात गॅस एजन्सी, 'हे' आहेत नियम आणि अटी

10वी उत्तीर्ण असलेले घेऊ शकतात गॅस एजन्सी, 'हे' आहेत नियम आणि अटी

तुम्हाला गॅस एजन्सी घ्यायची असेल तर नियम, अटी पुढीलप्रमाणे -

  • Share this:

मुंबई, 07 जून : मोदी सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर जास्तीत जास्त रोजगार सुरू करतंय. त्याचाच एक भाग म्हणून सरकारी तेल मार्केंटिंग कंपनी ( IOC, HPCL, BPCL ) या एका वर्षात 5 हजार गॅस डिस्ट्रिब्युटर्स नियुक्त करणार आहेत. सरकारनं नुकतेच 2 हजार लायसन्स दिलीयत. तुम्हाला गॅस एजन्सी घ्यायची असेल तर नियम, अटी पुढीलप्रमाणे -

गॅस वितरक म्हणून लायसन्स मिळाल्यानंतर गॅस एजन्सी सुरू करेपर्यंत एक वर्ष लागतं. यात स्थानिक प्रशासकीय मंजुरीबरोबर आॅफिस आणि गोडाऊनची सोयही करावी लागते. सध्या महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिसा इथे नवे वितरक हवेत. कारण इथे ग्राहक संख्या जास्त आहे.

दर महिन्याला मिळवा 60 हजार रुपये पेन्शन, मोदी सरकारच्या योजनेचा घ्या फायदा

LPG डिलरशिप घेण्याचे खूप कडक नियम आणि अटी आहेत. म्हणूनच अर्ज करण्याआधी पूर्ण तयारी करायला हवी.

इंडेन, भारत गॅस आणि एचपी या तीन गॅस कंपनी वेळोवेळी डिलरशिपसाठी अर्ज मागवत असते. शिवाय केंद्र सरकारच्या राजीव गांधी ग्रामीण एलपीजी डिस्ट्रिब्युटर योजनेअंतर्गतही अर्ज मागवले जातात. यात कंपनी एजन्सी आणि गोडाऊनसाठी निश्चित जागा सांगते.

मान्सूनवर पुन्हा अल् निनोचं संकट, कमी पाऊस होण्याची भीती

अर्ज पाठवल्यानंतर इंटरव्ह्यूला बोलावलं जातं. यात उमेदवारांना नंबर्स दिले जातात. त्याप्रमाणे रिझल्ट लागतो.

पॅनल सर्व उमेदवारांनी दिलेली माहिती पडताळून पाहते. जमिनीपासून सर्व गोष्टी तपासल्या जातात. त्यानंतर गॅस एजन्सी दिली जाते. उमेदवाराला ठराविक वेळ दिला जातो. त्यातच एजन्सी सुरू करावी लागते.

पाणी आणण्यासाठी निघालेल्या 11 वर्षीय मुलाचा ट्रॅक्टरखाली सापडून मृत्यू

आवश्यक अटी

उमेदवाराकडे कायमस्वरूपी पत्ता आणि जमीन हवी. गॅस एजन्सी आॅफिस आणि गोडाऊनसाठी जमीन हवी. जमीन कुठे हवी हे जाहिरातीत दिलं असतं. उमेदवार 10वी उत्तीर्ण हवा. त्याचं वय 21 वर्ष हवं. त्याचा बँक बॅलन्स आणि डिपाॅझिट रक्कमही हवी.

काही जागा आरक्षित

अनुसूचित जाती, जनजाती, स्वातंत्र्य सैनिक, खेळाडू, सामाजिकदृष्ट्या अक्षम लोक, पोलीस, सरकारी कर्मचारी यांना या वितरणात आरक्षण आहे. 50 टक्के सामान्य श्रेणीसाठी आहे.

गॅस एजन्सी देताना तिथे सुरक्षा व्यवस्थित आहे ना, हे पाहिलं जातं.

महापालिकेत अमोल कोल्हेंनी मांडला प्रलंबित कामांचा लेखाजोखा

First published: June 7, 2019, 1:31 PM IST
Tags: lpg

ताज्या बातम्या