• Home
  • »
  • News
  • »
  • money
  • »
  • 1 वर्षाच्या FD वर या बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, वाचा काय आहेत इंटरेस्ट रेट्स

1 वर्षाच्या FD वर या बँका देत आहेत सर्वाधिक व्याज, वाचा काय आहेत इंटरेस्ट रेट्स

Bank FD Rates: जाणून घ्या अशा कोणत्या बँका आहेत ज्या एका वर्षाच्या एफडीवर (Fixed Deposit- FD) सर्वाधिक व्याज देत आहेत.

  • Share this:
    नवी दिल्ली, 16 जून: बचतीचा एक उत्तम पर्याय म्हणून फिक्स्ड डिपॉझिटकडे पाहिलं जातं. सध्या सेव्हिंगसाठी विविध पर्याय उपलब्ध असताना अनेकजण एफडीला (FD) पंसती देतात. मात्र अलीकडे देशातील महत्त्वाच्या बँकांनी एफडीवर व्याजदर कमी केला आहे. अशावेळी तुम्ही एफडी काढण्याचा विचार करत असाल तर हे माहित करुन घेणं गरजेचं आहे की कोणती बँक चांगल्या दराने एफडी ऑफर करत आहे. काही महत्त्वाच्या बँका एका वर्षाच्या कालावधीसाठी चांगल्या दराने एफडीवर (Fixed Deposit)  व्याजदर देत आहेत. गेल्या काही काळात छोट्या खाजगी बँकांनी देखील एफडीवरील व्याजदरात कपात केली आहे. जसं की आरबीएल बँकेने एका वर्षााच्या एफडीसाठी व्याजदर 6.5 टक्क्यांवरून कमी करत 6.10 टक्के केले आहेत. याशिवाय इंडसइंड बँकेने एका वर्षाच्या एफडीवरील व्याजदर 6.5 टक्क्यावरून 6 टक्के केले आहेत. असे असले तरीही या बँका एका वर्षाच्या फिक्स्ड डिपॉझिटवर सर्वात चांगलं व्याज देत आहेत. एफडीमध्ये छोट्या बँकांकडून चांगलं व्याज मिळतं आहे. हे वाचा-सामान्यांचं बजेट कोलमडणार! आयात शुल्क कमी होऊनही खाद्यतेलाच्या दरात दिलासा नाही महत्त्वाच्या बँकांचे एका वर्षासाठीच्या FD वरील व्याजदर -RBL Bank: आरबीएल बँक 6.10% दराने व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नारिकांसाठी हा व्याजदर 6.6% आहे -IndusInd Bank: इंडसइंड बँक 6% दराने व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नारिकांसाठी हा व्याजदर 6.5% आहे -Yes Bank: येस बँक 6% दराने व्याज देत आहे, तर ज्येष्ठ नारिकांसाठी हा व्याजदर 6.5% आहे -Suryoday Small Finance Bank: सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक 6.75% दराने व्याज देत आहे -Ujjivan Small Finance Bank: उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक एका वर्षाच्या एफडीवर  6.50 टक्के दराने व्याज देत आहे -परदेशी बँकांमध्ये स्टँडर्ड चार्डट बँक आणि डीबीएस बँकांकडून एका वर्षाच्या एफडीसाठी अनुक्रमे 5.30 टक्के आणि 4.25 टक्के व्याज मिळते हे वाचा-SBI च्या या ग्राहकांना मिळेल 2 लाखांपर्यंतचा लाभ, अशाप्रकारे मिळवा फायदा -ICICI and HDFC: आयसीआयसीआई बँक आणि एचडीएफसी बँकेसारख्या मुख्य खाजगी बँकां एका वर्षाच्या एफडीवर 4.90 टक्के दराने व्याज देत आहेत -Axis Bank: अॅक्सिस बँक 5.15 टक्के दराने व्याज देत आहे -Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्रा बँक एका वर्षाच्या एफडीवर 4.50 टक्के दराने व्याज देत आहे. खाजी बँकांमधील हा सर्वात कमी व्याजदर आहे
    Published by:Janhavi Bhatkar
    First published: