S M L

'हा खेळ सावल्यांचा...', 'या' दिवशी सोडणार सावलीही साथ !

सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. हाच 'शून्य सावलीचा' अनुभव लवकरच राज्यभरात येत्या काही ठराविक दिवशी घेता येणार आहे.

Sachin Salve | Updated On: May 7, 2018 11:36 PM IST

'हा खेळ सावल्यांचा...', 'या' दिवशी सोडणार सावलीही साथ !

मुंबई, 07 मे : सावली ही कधीच आपली पाठ सोडत नाही, असं म्हणतात खरं...पण उद्या तुमची सावली तुमचा साथ सोडणार आहे.

पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडच्या भागात, तर कर्कवृत्ताच्या उत्तरेकडच्या भागात सूर्य कधीच डोक्यावर येत नाही. तो सदैव क्रमश: उत्तरेकडे किंवा दक्षिणेकडेच दिसतो, पण दोन टोकांच्या मधल्या लोकांना मात्र वर्षातून दोनदा सूर्य बरोबर डोक्यावर आलेला अनुभवायास मिळतो.

सूर्य बरोबर डोक्यावर आल्यानंतर सावली सरळ आपल्या पायाखाली पडते. हाच 'शून्य सावलीचा' अनुभव लवकरच राज्यभरात येत्या काही ठराविक दिवशी घेता येणार आहे. साधारणपणे सूर्यनारायण माथ्यावरती आल्यानंतरच हा सावल्यांचा खेळ तुम्हाला अनुभवता येणार आहे.या दिवशी तुमची सावली गायब होईल

 8 मे  - सिंधुदुर्ग, सांगली

11 मे - रत्नागिरी

Loading...

12 मे - सातारा, सोलापूर

13 मे - उस्मानाबाद

14 मे - रायगड, पुणे, लातूर

15 मे - अंबेजोगाई

16 मे - मुंबई, नगर, परभणी, नांदेड

17 मे - ठाणे, डोंबिवली, कल्याण

19 मे - औरंगाबाद, बीड, जालना, चंद्रपूर

20 मे - नाशिक, वाशीम गडचिरोली

21 मे - बुलडाणा, यवतमाळ,

22 मे - वर्धा

23 मे - धुळे

24 मे - भुसावळ, जळगाव

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2018 08:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close