S M L

झवेरी बाजार बाँबस्फोटातील दहशतवाद्याचा नागपूर कारागृहात मृत्यू

फाशीची शिक्षा सुनावलेला दहशतवादी मोहम्मद हनिफ अब्दुल रहिम याचा मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला.

News18 Lokmat | Updated On: Feb 11, 2019 05:45 PM IST

झवेरी बाजार बाँबस्फोटातील दहशतवाद्याचा नागपूर कारागृहात मृत्यू

प्रवीण मुधोळकर,प्रतिनिधी नागपूर, 11 फेब्रुवारी : मुंबईच्या गेट वे आँफ इंडिया आणि झवेरी बाजारात बॉम्बस्फोट घडवून आणल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला दहशतवादी मोहम्मद हनिफ अब्दुल रहिम याचा मध्यवर्ती कारागृहात मृत्यू झाला. या घडामोडीमुळे कारागृह आणि पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे.

हनीफ हा मुळचा मरोळ नाका, अंधेरी (ईस्ट) मुंबईचा रहिवासी होता. हनीफ आणि त्याच्या दहशतवादी साथीदारांनी मुंबईच्या झवेरी बाजारात 25 ऑगस्ट 2003 ला बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या स्फोटात अनेक निरपराधांचा मृत्यू झाला होता. तर, अनेक जण गंभीर जखमी झाले होते.

हा बॉम्बस्फोट घडवून आण्यात हनिफ सहभागी असल्याचे स्पष्ट झाल्यानं या स्फोटात हनिफ, त्याची पत्नी जायदा सय्यद तसंच अशरफ शफिक या तिघांना मुंबई उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती.


तो गेल्या पाच वर्षांपासून नागपूर मध्यवर्ती कारागृहात बंदीस्त होता. गेल्या काही दिवसांपासून हनिफची प्रकृती खालावली होती. शनिवारी सायंकाळी त्याची प्रकृती अचानक ढासळली. कारागृहात प्राथमिक उपचार केल्यानंतरही त्याला आराम पडत नसल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी हनिफला मृत घोषित केलं.

पोलिसांनी या प्रकरणाची माहिती गृहमंत्रालय, मुंबई पोलीस प्रशासन तसंच हनीफच्या नातेवाईकांना कळविली. दरम्यान, मृत हनिफच्या मृतदेहावर नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात इनकॅमेरा पोस्टमाॅर्टम करण्यात आलं आहे.


Loading...

=============

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 11, 2019 05:45 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close