आवडीचा उमेदवार निवडणुकीत पडल्याने तरुणाने प्राशन केले गोचीड मारण्याचं औषध

आवडीचा उमेदवार निवडणुकीत पडल्याने तरुणाने प्राशन केले गोचीड मारण्याचं औषध

लोकसभेच्या निवडणुकीत आवडीचा उमेदवार पडल्याने एका तरुणाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा माहिती समोर आली आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, (प्रतिनिधी)

सोलापूर, 24 मे- लोकसभेच्या निवडणुकीत आवडीचा उमेदवार पडल्याने एका तरुणाने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा माहिती समोर आली आहे. पांडुरंग शिंदे (वय-24) असं या आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथील तो रहिवासी असून त्याच्यावर बार्शीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय शिंदे यांचा पराभव झाला म्हणून पांडुरंग शिंदे याने गोचीड मारण्याचं  औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

पांडुरंग शिंदे हा तरुणाने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितले की, तो आई, वडील, पत्नी व मुलासोबत माढा तालुक्यातील शिंदेवाडी येथे राहतो. तो म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन सुतगिरणीत एआर विभागात क्लार्क म्हणून नोकरी करतो.

माढा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संजय शिंदे पराभव झाला. या टेन्शनमध्ये आपण मेडिकल स्टोअर्समधून गोचीड मारण्याचं औषध प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तो जागेवरच बेशुद्ध होऊन पडला. पांडुरंग याचा चुलतभाऊ गजेंद्र शंकर शिंदे याने त्याला तातडीने बार्शी येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. त्यामुळे सुदैवाने पांडुरंग थोडक्यात बचावला.

राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात फुलले कमळ

माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती. राष्ट्रवादीचे संजय शिंदे आणि भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या काट्याची लढत झाली. सुरूवातीच्या कलांमध्ये माढा मतदार संघामध्ये दोन्ही मतदारांमध्ये चुरशीची लढत सुरू होती. अखेरच्या काही फेरींमध्ये निंबाळकरांनी आघाडी घेत विजयश्री मिळवत राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवले. संजय शिंदे यांचा दारुण पराभ झाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गडाला भाजपाने खिंडार पाडले असेच म्हणावे लागेल.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून निवडणुकीतून माघार घेतली होती


'आ देखे जरा किसमे कितना है दम', भाजप आमदाराच्या डान्सचा VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 24, 2019 02:40 PM IST

ताज्या बातम्या