मराठा क्रांती मोर्च्याचे नेतृत्व तरूणांकडे; सरकारला दिला अल्टिमेटम

मराठा क्रांती मोर्चाची महासभा औरंगाबादेत पार पडली. या सभेत हा निर्णय घेण्यात आलाय.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Oct 29, 2017 09:03 PM IST

मराठा क्रांती मोर्च्याचे नेतृत्व तरूणांकडे; सरकारला दिला अल्टिमेटम

औरंगाबाद, 29 ऑक्टोबर: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मराठा तरुण गनिमी काव्यानं लढा उभारेल असा इशारा देण्यात आलाय. मराठा क्रांती मोर्चाची महासभा औरंगाबादेत पार पडली. या सभेत हा निर्णय घेण्यात आलाय.

सरकारजवळ दोन महिने आहेत. सरकारनं आत्ताचं निर्णय घ्यावा नाहीतर मराठा तरुण काय करेल हे कळेलच असा गर्भीत इशाराही मराठा तरुणांनी दिलाय. मराठा क्रांती मोर्चा आता नव्या पद्धतीने लढा उभा करणार आहे. आणि या लढ्याचं नेतृत्व मराठा तरुण करतील असा ठराव आज औरंगाबादमध्ये झालेल्या महासभेत घेण्यात आलाय. या महासभेत राज्यातील समन्वयक सामिल झाले होते. येणाऱ्या हिवाळी अधिवेशन पर्यंत सरकारला अल्टीमेटम देण्यात आला आहे. हिवाळी अधिवेशनात ठोस निर्णय झाला नाही तर मराठा तरुण आता बोलून नाही करुन दाखवणार असा इशारा या वेळी देण्यात आलाय.

त्यामुळे मराठा समाजाचे प्रश्न चिघळतात की सुटतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2017 07:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...