धक्कादायक! 'या' कारणावरून पोलिसांनी केला छळ, युवकाची आत्महत्या

धक्कादायक! 'या' कारणावरून पोलिसांनी केला छळ, युवकाची आत्महत्या

या सगळ्या प्रकारावर खेडकर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या बाहेर खेडकर कुटुंबीयांनी धरणे आंदोलन केलं आहे.

  • Share this:

उल्हासनगर, 03 मे : उल्हासनगरमध्ये पोलिसांच्या जाचाला कंटाळून युवकाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. युवकाने वैतागून स्वत:ला गळफास लावून घेतला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सतीश खेडकर असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. मयत सतीश हॉटेल व्यावसायिक आहे. त्याला वारंवार पोलिसांकडून त्रास देण्यात यायचा आणि म्हणून त्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारावर खेडकर कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या बाहेर खेडकर कुटुंबीयांनी धरणे आंदोलन केलं आहे.

सतीशचं हॉटेल असल्यामुळे पोलीस वारंवार त्याच्याकडून हप्ता मागत असत. त्यासाठी पोलिसांकडून सतीशला वारंवार त्रास देण्यात आला असं पोलीस तक्रारात म्हणण्यात आलं आहे. पोलिसांच्या याच जाचाला कंटाळून सतीश स्वत:चं आयुष्य संपवलं.

या प्रकरणासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून आता याचा तपास सुरू आहे. दरम्यान, घरातल्या मुलाला अशा पद्धतीने गमावल्यामुळे खेडकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे तर संपूर्ण परिसरातून यावर शोक व्यक्त केला जात आहे.


ओडिशामध्ये समुद्रकिनारा खवळला, पाहा थेट LIVE दृश्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2019 12:20 PM IST

ताज्या बातम्या