SPECIAL REPORT : टिकटॉकवर बंदूक घेऊन करत होते व्हिडिओ, गोळी सुटली आणि 'खेळ' संपला!

SPECIAL REPORT : टिकटॉकवर बंदूक घेऊन करत होते व्हिडिओ, गोळी सुटली आणि 'खेळ' संपला!

टिकटॉकचा जीवघेणा नाद तरुणाच्या जीवावर बेतला आहे. शिर्डीत प्रतीक वाडेकर या तरुणाचा टिकटॉकच्या नादात हकनाक मृत्यू झाला आहे

  • Share this:

शिर्डी, 12 जून : टिकटॉकचा जीवघेणा नाद तरुणाच्या जीवावर बेतला आहे.  शिर्डीत प्रतीक वाडेकर या तरुणाचा टिकटॉकच्या नादात हकनाक मृत्यू झाला आहे.

काकाच्या तेराव्याच्या कार्यक्रमासाठी प्रतीक शिर्डीत आला होता. प्रतीक आणि त्याचे नातेवाईक पावनधाम हॉटेलवर टिकटॉक व्हिडिओ बनवत होते.

त्याचवेळी सनी पवार या तरुणाच्या हातातील गावठी कट्ट्यातून गोळी सुटली आणि थेट प्रतीकच्या छातीत घुसली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

प्रतीकचा जागीच मृत्यू झाल्यानंतर चौघांनी तिथून पळ काढला. मात्र, तपासाअंती जीवघेणं सत्य समोर आलंय.

मात्र यामुळे 2 प्रश्न समोर झाले आहे. कॉलेजवयीन तरुणांकडे देशी कट्टे कसे आले?  आणि सोशल मीडियाची जीवघेणी झिंग तरुणांच्या डोक्यातून उतरणार तरी कधी?

Loading...


====================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 12, 2019 08:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...