S M L

पिंपरीत मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला

विशेष म्हणजे हा संपूर्ण मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

Samruddha Bhambure | Updated On: May 7, 2017 09:14 PM IST

पिंपरीत मित्रांसोबत नदीत पोहण्यासाठी गेलेला तरुण बुडाला

07 मे : पोहायला जाणाऱ्या तरुणांना अनेकदा स्टंटबाजी करण्याचा मोह आवरत नाही. असाच एक स्टंट मावळ तालुक्यातील सांगवडेच्या पवना नदीत एक तरुण करायला गेला आणि तो त्याच्या जीवावर बेतला आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झाला आहे.

मित्रांसोबत पोहायला गेलेल्या मुदस्सर खान या तरुणानं नदीवरच्या एका पुलावरुन उडी टाकली. मात्र मध्येच त्याला दम लागल्यानं तो किनाऱ्यावर पोहोचू शकला नाही. मित्रांना काय घडलं हे समजण्याआधीच तो पाण्यात बुडाला.

घरच्यांना न सांगता पोहायला आलेल्यांची खोड मोडण्यासाठी त्यापैकी एकाने मोबाईल मध्ये हे चित्रीकरण केले आणि त्यामध्ये ही जीवघेणी स्टंटबाजी कैद झाली.

दरम्यान, पिंपरी-चिंचवड अग्निशमन दल आणि बचाव दलाकडून त्याचा शोध घेतला गेला. मात्र, तरुणाचा पत्ता अजून लागलेला नाही, त्यानंतर आज सकाळी मुदस्सरचं शव पाण्यातून बाहेर काढण्यात आलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 7, 2017 01:43 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close