गर्दीचा आणखी एक बळी.. डोंबिवलीत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

प्रवाशांच्या गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरूवारी सकाळी डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान एका 26 वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली.

News18 Lokmat | Updated On: Jul 25, 2019 10:20 PM IST

गर्दीचा आणखी एक बळी.. डोंबिवलीत लोकलमधून पडून तरुणाचा मृत्यू

डोंबिवली, 25 जुलै- प्रवाशांच्या गर्दीमुळे धावत्या लोकलमधून पडून 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरूवारी सकाळी डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान एका 26 वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली. शिव वल्लभ कुमार असे या तरुणाचे नाव आहे.

डोंबिवली रेल्वे स्थानकात मुंबईला जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गर्दी वाढत आहे. या गर्दीतून ढकलाढकली आणि धक्काबुक्की करीत डब्यात प्रवेश करणे हीच मोठी कसरत असते. कसेबसे डब्यात शिरायला मिळते. मात्र, आतमध्ये जागाच नसल्याने अनेकांना दरवाजातच लोंबकळत प्रवास करावा लागतो.

सोमवारी सकाळी 9 वाजून 25 मिनिटांला डोंबिवलीत राहणाऱ्या सविता फकीरा नाईक (वय-30) या तरुणीचा कोपर-दिवा स्थानकांदरम्यान धावत्या लोकलमधून तोल जाऊन खाली पडून मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेला तीन दिवस झाले नाही तोच गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास डोंबिवली-कोपर रेल्वे स्थानकांदरम्यान एका 26 वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

शिव वल्लभ कुमार हा तरुण डोंबिवलीत राहत होता. मशीद बंदर येथील एका खासगी कंपनीत तो नोकरी करत होता. नेहमीप्रमाणे आज तो कामावर निघाला होता. कर्जतकडून येणारी 8 वाजून 50 मिनिटांची जलद लोकल त्याने पकडली. या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याने त्याला आतमध्ये शिरता आले नाही. रेल्वेच्या दरवाजातच लोंबकळत प्रवास करावा लागल्याने डोंबिवली-कोपर स्थानकादरम्यान त्याचा तोल जावून तो लोकलमधून खाली पडल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

VIDEO:फुटपाथवरून जात होती महिला, अचानक उघड्या गटारात पडली

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jul 25, 2019 10:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...