युवकाच्या हत्येनं परळी हादरलं, गटारामध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

पहाटेच्या वेळी स्थानिकांना युवकाचा मृतदेह गटारामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली.

सुरेश जाधव सुरेश जाधव | News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 05:08 PM IST

युवकाच्या हत्येनं परळी हादरलं, गटारामध्ये रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

परळी (बीड), 08 मे : परळी शहरातील हिंदनगर भागात अज्ञात युवकाची हत्या करण्यात आली आहे. सकाळी 5च्या सुमारास गटारामध्ये युवकाचा मृतदेह आढळून आल्याने खळहळ उडाली आहे. परळीसारख्या भागात अशी हत्या झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

पहाटेच्या वेळी स्थानिकांना युवकाचा मृतदेह गटारामध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. त्यानंतर या प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू असल्याची माहिती नागरिकांकडून देण्यात आली. त्यामुळे यातूनच युवकाची हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

पोलिसांनी घटनास्थळावरून मृतदेह ताब्यात घेतला असून तो परळीच्या उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पावण्यात आला आहे. पण अद्याप हत्या झालेल्या युवकाची ओळख पटवण्यात आलेली नाही. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहे.

मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी नागरिकांची चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. तर यात अधिक माहितीसाठी पोलीस प्रत्यक्षदर्शी आणि परिसराती सीसीटीव्हीचादेखील शोध घेणार आहे.

दरम्यान, बीडमध्ये खुनाचे आणि आत्महत्येचे प्रकार वाढत आहे. प्रेमसंबंधातून आणि रागातून हत्या किंवा आत्महत्या केल्याच्या घटना रोज बीडमध्ये घडतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. आताची तरुणाई या सगळ्यात अडकू नये यासाठी बीड पोलिसांनी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यात नागरिकांची मदतही तितकीच महत्त्वाची आहे.

Loading...


VIDEO : राज ठाकरेंनी शिवसेना का सोडली? नारायण राणेंचा मोठा गौप्यस्फोट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 05:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...