जळगावात तरुणाने फुलवली अमेरिकन केसरची शेती

जळगावात तरुणाने फुलवली अमेरिकन केसरची शेती

जळगाव जिल्ह्यातील पहूर या गावात डॉ. अनिकेत लेले या तरुण शेतकऱ्याने अर्धा एकर शेतात अमेरिकन केसर यशस्वी लागवड केली असून एकूण १५ किलो केसरचं उत्पादन घेतलंय.

  • Share this:

राजेश भागवत,  जळगाव

31 मार्च :  डॉक्टर तात्या लहाने यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. पदाचा गैरवापर करून छगन भुजबळ यांना मदत केल्या प्रकरणी आता मुंबई हायकोर्टाने डाॅ. लहाने यांना नोटीस बजावली आहे. मुंबई हायकोर्टाने लहाने यांना या नोटीशीला 4 आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलय. त्यामुळे आता लहाने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

तात्याराव लहाने, जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता इतकीच त्यांची मर्यादित ओळख नाहीये. तर, मोतीबिंदूच्या विक्रमी संख्येने शस्रक्रीया केल्याने पद्मश्री पुरस्काराने गौरवलेले विख्यात नेत्रशल्य विशारद अशी त्यांची गौरवपूर्ण ओळख. लहानेंबाबत काही वाद यापूर्वीही झालेत खरे पण आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपावरुन  जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळांना जेलबाहेर बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये ठेवण्यात तात्याराव लहाने यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मदत केल्याबद्दल विशेष ईडी कोर्टाने यांना दोषी ठरवलं आणि लहानेंच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा गेलाय.

आता या प्रकरणात लहाने यांना काय शिक्षा करायची याचा फैसला मुंबई हायकर्टाला घ्यायचा आहे. त्यासाठी आता हायकोर्टानं लहाने यांना नोटीस बजावली आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ईडी कोर्टात या प्रकरणाची याचिका केल्याने भुजबळांना केलेल्या मदतीचा प्रकार उघड झाला होता. छगन भुजबळ यांनी तब्बल 35 पेक्षा जास्त दिवस यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुक्काम केला होता. तात्याराव लहाने यांच्या मदतीनेच भुजबळ यांनी हा मुक्काम केल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.

वैयक्तिक संबंधापोटी जेव्हा कर्तव्याला तिलांजली दिला जाते तेव्हा काय होतं याचं हे मोठं उदाहरण. अपेक्षा आहे यातून किमान इतरांनी तरी बोध घ्यावा.

जळगाव जिल्ह्यातील पहूर या गावात डॉ. अनिकेत लेले या तरुण शेतकऱ्याने अर्धा एकर शेतात अमेरिकन केसर यशस्वी लागवड केली असून एकूण १५ किलो केसरचं उत्पादन घेतलंय. थंड हवामानात पिकणाऱ्या केसरला जळगावात अतिशय उष्ण हवामानात पिकवून जणू परिसरातील शेतकऱ्यांना नवीन दिशा देण्याचेचं काम डॉ. लेले यांनी केलं आहे.

जळगाव म्हटलं की समोर येतात ते भरीतासाठी प्रसिद्ध असलेली वांगी. पण आता जळगाव आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध होतंय. ते म्हणजे जळगावमध्ये आता केशराचं उत्पादन घेतलं जातं आहे. साधारणत: केशराची लागवड अतिथंड परिसरात होतं. आतापर्यंत काश्मीरसारख्या थंड हवेतच केशराची शेती केली जायची. पण जळगावसारख्या उष्ण ठिकाणी डॉक्टर अनिकेत लेले यांनी केशराच्या एका अमेरिकन प्रजातीचं पीक घेतलं आहे. जळगावच्या पहुरमध्ये डॉ. लेले यांनी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात अर्धा एकरवर केशराची लागवड केली.  फक्त साडेपाच महिन्यांमध्ये एकूण १५ किलो केशराचं उत्पादन त्यांना मिळालं आहे. विशेष म्हणजे आपला डॉक्टरी व्यवसाय सांभाळून अनिकेत लेले यांनी हा यशस्वी प्रयोग केला.

अनिकेत यांनी  दोन लाख रुपयांचं अमेरिकन केशराचं बियाणं आणलं. त्यासाठी फक्त जैविक खतंच वापरली. पुण्यातील नाफारी स्वारगेट या प्रयोग शाळेत हे केशर पाठविलं जातं. या प्रयोगशाळेत त्याच्या गुणवत्ते नुसार केशराला गुणवत्ता  प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे गुणवत्तेनुसार केशराला  ४० हजार ते १ लाख रूपये किलोप्रमाणे भाव मिळतो. अमेरिकन  केशाराला मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर, दिल्ली, राजस्थान इथल्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.

खान्देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे. पण निराश न होता असे नवनवीन प्रयोग करण्याचं आवाहन डाॅ. अनिकेत लेले यांनी शेतकऱ्यांना केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2017 09:18 AM IST

ताज्या बातम्या