दुष्काळ निधीचे पैसे जमा न झाल्याने तरुण शेतकऱ्याने लावला गळफास, 7 वर्षांपूर्वी वडिलांनीही केली होती आत्महत्या

आर्थिक विवंचनेत असलेल्या अमोलने घरी आल्यावर आधारकार्ड, बँकेचे पासबूक जाळले व घराला कुलूप लावून रात्री 9 वाजेच्या सुमारास शेताकडे निघून गेला.

News18 Lokmat | Updated On: Apr 26, 2019 01:19 PM IST

दुष्काळ निधीचे पैसे जमा न झाल्याने तरुण शेतकऱ्याने लावला गळफास, 7 वर्षांपूर्वी  वडिलांनीही केली होती आत्महत्या

वाशिम, २६ एप्रिल- शेती, शेतीच्या समस्या, कर्जबाजारीपणा, नापिकी या संकटातून विदर्भातील शेतकरी अद्याप बाहेर पडलेला नाही. परिणामी शेतकरी आत्महत्या थांबलेल्या नाहीत. रिसोड तालुक्यातील मांडव्या येथे एका तरुण शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आपला जीवनप्रवास संपवला. दुष्काळ निधीचे पैसे जमा न झाल्याने या तरुण शेतकऱ्याने गळफास लावला. 7 वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांनीही आत्महत्या केली होती.


अमोल भीमराव राठोड (20 ) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. अमोलच्या आईच्या नावे केवळ 2 एकर कोरडवाहू शेती असल्याचे समजते.अमोल हा गुरुवारी रिसोडच्या बँकेत दुष्काळ निधी व इतर पैसे जमा झाले की नाही हे पाहण्यासाठी  गेला होता. परंतु, खात्यात पैसे जमा न झाल्याने तो झाला.  नंतर तो गावी परतला.आर्थिक विवंचनेत असलेल्या अमोलने घरी आल्यावर आधारकार्ड, बँकेचे पासबूक जाळले व घराला कुलूप लावून रात्री 9 वाजेच्या सुमारास शेताकडे निघून गेला. शुक्रवारी सकाळी शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तो दिसून आला. अमोलचे वडील भीमराव राठोड यांनीही 7 वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती.


VIDEO: अर्जदाखल करण्याआधी नरेंद्र मोदींनी घेतलं कालभैरवाचं दर्शन

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 26, 2019 12:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...