News18 Lokmat

लठ्ठ म्हणून भाऊ उडवत होते खिल्ली, 19 वर्षीय तरुण पोहोचला रेल्वे रुळावर...

शरीराने लठ्ठ असल्याने लहान आणि मोठा भाऊ खिल्ली उडवतात म्हणून एका 19 वर्षीय तरूणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

News18 Lokmat | Updated On: Jul 21, 2019 08:33 PM IST

लठ्ठ म्हणून भाऊ उडवत होते खिल्ली, 19 वर्षीय तरुण पोहोचला रेल्वे रुळावर...

सचिन जिरे, (प्रतिनिधी)

औरंगावाद, 21 जुलै- शरीराने लठ्ठ असल्याने लहान आणि मोठा भाऊ खिल्ली उडवतात म्हणून एका 19 वर्षीय तरूणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, रेल्वे येण्याअगोदर विशेष पोलीस अधिकारी देवदूताच्या रुपात आल्याने तरूणाचे प्राण थोडक्यात बचावले. तरुणाला समज देऊन त्याला आई-वडिलांना स्वाधीन करण्यात आले. अतुल शिवाजी बोंद्रे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरूणाचे नाव आहे. रविवारी दुपारी ही घटना औरंगाबाद शहरातील संग्रामनगर उड्डाणपुलाखाली घडली.

अतुल हा हातात पिशवी घेऊन संग्रामनगर रेल्वे उड्डाणपुलाखाली रेल्वे रुळावर बसला होता. त्याचवेळी अनेक जण त्याच्या आजूबाजूने जात होते. मात्र, कोणीही त्यास हटकले नाही. त्याचदरम्यान विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोरडे आणि त्यांच्या सहकऱ्यांनी अतुसचे निरीक्षण करत होते. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होती. तो निराश दिसत होता. त्याचवेळी अतुल बसलेल्या रुळावर रेल्वे येत होती. हे पाहून श्रीमंत गोरडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अतुलच्या दिशेने धाव घेतली. त्यांनी अतुल रेल्वे रुळावरून उठवले. त्याला धीर दिला. त्याला विचारणा केली असता त्यांच्याकडे त्याने आपले दु:ख शेअर केले. सख्खे दोन भाऊ लठ्ठ म्हणून खिल्ली उडवतात. झोपूही देत नाही, यामुळे आपण आत्महत्या करण्याच्या विचाराने रेल्वे रुळावर बसलो होतो, असे अतुलने सांगितले. अतुलला समज देऊन त्याला जवाहर नगर पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आले. तिथेही पोलिसांनी त्याचे समुपदेशन केले. नंतर त्याला आई-वडिलांना स्वाधीन करण्यात आले.

हास्य-विनोद आपल्या जीवनाचा एक भाग आहे. जीवनात हास्य नसेल तर सर्वकाही निरस वाटू लागते. परंतु टिंगल, खिल्ली उडवण्याच्या नादात एखाद्याचा अपमान करणे किंवा त्याला दुःख होईल, असे करणे चुकीचे आहे. याच कारणावरून अतुल आत्महत्या करण्यासाठी निघाला होता, हे थक्क करणारे असल्याचे विशेष पोलीस अधिकारी श्रीमंत गोर्डे यांनी यावेळी सांगितले.

फडणविसांचा शिवसेनेला दणका, मुख्यमंत्रिपदाच्या वादावर दिलं उत्तर

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: aurangabad
First Published: Jul 21, 2019 08:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...