S M L

शिर्डीत तरूणाची हत्या; 9 संशयित ताब्यात

शिर्डीत तरूणाची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे.

Updated On: Apr 24, 2019 02:36 PM IST

शिर्डीत तरूणाची हत्या; 9 संशयित ताब्यात

शिर्डी, 24 एप्रिल : शिर्डीमध्ये तरूणाच्या हत्येनं खळबळ उडाली आहे. मंगेश पाईक असं या हत्या झालेल्या तरूणाचं नाव आहे. मंगळवारी मध्यरात्री ही हत्या झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर वेगानं सुत्रं हालली. तरूणाचं नाव कळल्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. याप्रकरणात पोलिसांनी 9 संशयितांना ताब्यात घेतलं असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. दरम्यान, पूर्ववैमनस्यातून मंगेशची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. यामध्ये अद्याप देखील कुणाला अटक केलेली नाही. याप्रकरणी अधिक तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. सर्व शक्यतांचा विचार हा पोलिसांकडून केला जात आहे.

नातेवाईक आक्रमक

मंगेश हा शिर्डीतील भिमनगर भागात राहणारा होता. तो मित्रांसोबत बाहेर गेला होता. त्यानंतर तो रात्री परत आलाच नाही. दरम्यान, रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मंगेशचा मृतदेह हा साईबाबा प्रसादालयाजवळ आढलून आला. संतप्त नागरिकांनी पोलीस ठाणे गाठत आरोपींना त्वरीत अटक करा अशी मागणी केली. यानंतर पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेतलं आहे.


दरम्यान, ताब्यात घेण्यात आलेल्यांपैकी काही जणांना या प्रकरणाशी काहीही संबंध नसताना ताब्यात घेण्यात आल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे. ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आहे त्यांनाच अटक करा अशी मागणी आता काही महिलांनी केली आहे.


VIDEO: बापरे ! ATM बॉक्सच्या आतमध्ये होता साप...

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: murder
First Published: Apr 24, 2019 12:44 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close