• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'बसंती' साठी तो पुलावर चढला, 'विरू'गिरी करणाऱ्या तरुणाला असं वाचवलं
  • VIDEO : 'बसंती' साठी तो पुलावर चढला, 'विरू'गिरी करणाऱ्या तरुणाला असं वाचवलं

    News18 Lokmat | Published On: Mar 6, 2019 05:17 PM IST | Updated On: Mar 6, 2019 05:21 PM IST

    मुजीब शेख, नांदेड, 06 मार्च : आवडत्या मुलीशी लग्न लावून न दिल्यानं एका युवकानं शोले स्टाईल आत्महत्येचा प्रयत्न केला . गोदावरी नदीच्या पुलावर चढलेल्या या तरुणाला एका धाडसी तरुणाने वाचवलं. नांदेड शहरात हा प्रकार घडला. शहरातील गोवर्धन घाट पुलावर दुपारी एक मद्यधुंद तरुण पुलावर चढला. कुटुंबीयांनी आवडत्या मुलीशी लग्न लावून दिलं नाही, त्यामुळे आपण नदीत उडी घेऊन आत्महत्या करणार असल्याचं तो ओरडून सांगू लागला. या ठिकाणी बरीच गर्दी देखील जमली. या गर्दीत जमलेले तरुण त्याला आत्महत्या न करण्याची विनंती करत होते. पण तो ऐकायच्या मनस्थितीत नव्हता. एका तरुणाने त्याच्या भावाला फोन लावून दिला. तो फोनवर बोलत असतांना दुसऱ्या युवकांने क्षणात झडप घालून त्याचा हात पकडला. अन्य लोकांनी त्याला पकडून पुलावरून खाली खेचले. नंतर जमलेल्या नागरिकांनी त्याला चोप देऊन नातेवाईकांच्या स्वाधीन केलं. जयेश पटेल असं या तरुणाचं नाव असून तो नांदेडचा रहिवाशी आहे. मद्यधुंद अवस्थेत त्याने हा प्रकार केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी