News18 Lokmat

'त्या' नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी आता हा प्रयोग

नागपूरच्या महाराज बागेतील वाघिणीच्या मूत्राचा वापर केल्या जात असून वाघिणीचा वावर असलेल्या जंगलातील परिसरात हे मूत्र वन विभागाच्या वतीने फावरण्यात आले. yetomal, tigress, forest, nagpur, new experiment, trap, ralegaon

News18 Lokmat | Updated On: Oct 30, 2018 06:05 PM IST

'त्या' नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी आता हा प्रयोग

यवतमाळ, 30 ऑक्टोबर : राळेगाव तालुक्यातील नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी आता नागपूरच्या महाराज बागेतील वाघिणीच्या मूत्राचा वापर केल्या जात असून वाघिणीचा वावर असलेल्या जंगलातील परिसरात हे मूत्र वन विभागाच्या वतीने फावरण्यात आले. या मूत्राचा उग्र गंधाचा पाठलाग करत वाघीण झुडपातून बाहेर येईल आणि तिला जेरबंद करण्यासाठी मदत होईल, या उद्देशाने या नवीन प्रयोगाला सुरुवात करण्यात आलीय.

राळेगाव तालुक्यातील टी-1 ही नरभक्षक वाघिण अखेर कॅमेऱ्यात कैद झालीये. वनविभागाने वाघिणीला पकडण्यासाठी नवी शक्कल लढवली असून, महाराज बागेतील वाघिणीचे मूत्र जंगलात फवारून नरभक्षक वाघिणीला पकडण्याचा प्रयत्न केला जात आहे.

महाराज बागेतील वाघिणीच्या उग्र वासाचा पाठलाग करत नरभक्षक वाघीण झुडपातून बाहेर येईल आणि तिला जेरबंद करण्यासाठी मदत होईल या उद्देशाने या नवीन प्रयोगाला सुरुवात करण्यात आला आहे. या प्रयोगाला काही प्रमाणात यशही आलंय. जंगलातील 652 बीट मध्ये करण्यात आलेल्या या प्रयोगानंतर नरभक्षक वाघीण कॅमेऱ्यात कैद झालीय. कॅमेऱ्यात टिपल्या गेल्यामुळे वाघिणीला जेरबंद करण्याच्या वनविभागाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

 VIDEO : वानराने गारुड्याचा साप पळवला आणि खाऊन टाकला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 30, 2018 06:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...