S M L

गावाकडचे गणपती : भक्तांची चिंता मुक्त करणारा कळंबचा चिंतामणी

यवतमाळ शहरापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असलेला कळंबचा चिंतामणी गणपती हा भाविकांना चिंतेतून मुक्ती देतो.

Updated On: Sep 11, 2018 09:13 PM IST

गावाकडचे गणपती : भक्तांची चिंता मुक्त करणारा कळंबचा चिंतामणी

भास्कर मेहरे, यवतमाळ, 11 सप्टेंबर : यवतमाळ शहरापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असलेला कळंबचा चिंतामणी गणपती हा भाविकांना चिंतेतून मुक्ती देतो. अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळं बाराही महिने या चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी होत असते. चला तर मग आपणही चिंतेतून मुक्त होऊयात.

यवतमाळ शहरापासून अवघ्या 22 किलोमीटर अंतरावर असलेलं हे आहे चिंतामणी गणपतीचं मंदिर. कळंब गावातलं दक्षिण मुखी गणपतीचं हे मंदिर जमिनीपासून 33 फूट खोल आहे. या गणपतीचं दर्शन घेतलं की चिंतेतून मुक्ती मिळते. कुठलंही संकट आलं तर भाविक या ठिकाणी येऊन आपल्यावरचं संकट या चिंतामणीला सांगतात. त्यामुळं त्यांची संकटातून मुक्ती होते, अशी श्रद्धा इथल्या भाविकांची आहे. त्यामुळं विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रातून त्याचबरोबर आंध्रप्रदेश आणि दिल्लीसारख्या ठिकाणाहूनही इथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करतात.

गौतम कृषींनी भगवान इंद्राला शाप दिला होता. आणि या ठिकाणी गणपतीच्या मुर्तीस्थापनेसाठी आज्ञा दिली. आणि त्या ठिकाणी कुंडाची उभारणी करून त्या पाण्यानंच अघोळ करायला सांगितली. त्यामुळं भगवान इंद्रानं या नगरीत गणपतीची स्थापनी केली. दर 12 वर्षानं या मंदिरात गंगा येते आणि जो पर्यंत गणपतीच्या चरणाला ती स्पर्श करत नाही तोपर्यंत ते पाणी कमी होत नाही अशी अख्यायिका आहे.अऩेक भक्त असे आहेत की, कुठलंही काम सुरु करण्याआधी ते या ठिकाणी येऊन चिंतामणी गणपतीचं आशीर्वाद घेतात. चिंतामणीची आठवण काढली तर भाविकांचे आत्मिक बळ वाढते आणि त्यांच्या मनाला प्रसन्नता प्राप्त होते.

हा गणपती नवसाला पावणारा आहे. अऩेक भाविकांच्या इच्छाही पूर्ण झाल्यात. श्रद्धेमुळं लोकांची संकटातून सुटका झाली. सुरुवातीच्या काळात या मंदिराला फारशी प्रसिद्धी नव्हती. मात्र जशी भक्तांना प्रचिती येत गेली तशी लोकांची गर्दी वाढत गेली. आणि या गर्दीसोबत इथल्या लोकांना रोजगारही मिळत गेला.

 या 5 गोष्टी गणपती बाप्पाला खूप आवडतात, पूजेच्या वेळी नक्की ठेवा

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 11, 2018 09:04 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close