संतप्त शेतकऱ्यांचं बँकेसमोर 'जवाब दो' आंदोलन!

संतप्त शेतकऱ्यांचं बँकेसमोर 'जवाब दो' आंदोलन!

संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी जवळा येथील स्टेट बँकेच्या प्रवेशद्वारातच 'जवाब दो' आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

  • Share this:

यवतमाळ, 5 ऑगस्ट : आर्णी तालुक्यातील जवळा परिसरात अनेक शेतकऱ्यांना कर्ज माफीचा लाभ मिळालाच नाही. अशातच बँका सुद्धा पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी जवळा येथील स्टेट बँकेच्या प्रवेशद्वारातच 'जवाब दो' आंदोलन करून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

गेल्या वर्षी गुलाबी बोण्ड अळीने कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे कबरडे मोडले. शेतकऱ्यांचा लावलेला पैसा सुद्धा निघाला नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय. त्यातच सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीचा लाभ अद्याप शेतकऱ्यांना मिळाला नाही. अशातच या वर्षी कर्ज देण्यास बँक टाळाटाळ करत असल्यामुळे जवळा परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत.

एकंदर परस्थितीमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी बँकेच्या धोरणाचा निषेध करत स्टेट बँकेच्या प्रवेशद्वारात 'जवाब दो' आंदोलन केलं. यावेळी बँकचे अधिकारी आणि शेतकरी यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्वरित कर्ज वितरित करण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

 VIDEOS : 'राम कदमांच्या फोटोला घातल्या बांगड्या'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 5, 2018 07:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...