Year Ender 2018 : उद्धव ठाकरेंचं वजन वाढवणारे 6 दणके

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी सरतं वर्ष सर्वात चांगलं राहिलं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. वर्षाअखेरीस सेनेनं हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेतला.

News18 Lokmat | Updated On: Dec 31, 2018 07:28 AM IST

Year Ender 2018 :  उद्धव ठाकरेंचं वजन वाढवणारे 6 दणके

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी सरतं वर्ष सर्वात चांगलं राहिलं, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.  वर्षाअखेरीस सेनेनं हिंदुत्त्वाचा अजेंडा हाती घेतला. 'जय श्रीराम' म्हणत उद्धव यांनी, "मैं बालासाहब का लडका हुँ" हे दाखवून दिलं आहे.


अयोध्या दौरा

या सरत्या वर्षात उद्धव ठाकरेंना आणि शिवसेनेला काय मिळालं तर आपसूक कुणीही सांगेल, सेनेला राम मंदिराचा मुद्दा मिळाला आहे. उद्धव ठाकरे यांचा अयोध्या दौरा पूर्णपणे यशस्वी ठरला. दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी अयोध्येला जाण्याची घोषणा केली. त्यानुसार, 25 नोव्हेंबरला उद्धव अयोध्येला रवाना झाले. उद्धव यांच्या दौऱ्याचे पडसाद देशभरात उमटले. सर्वच क्षेत्रातून उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा झाली. सोशल मीडियावर राम मंदिर आणि अयोध्या हा त्या दिवसातला सर्वात जास्त चर्चेचा विषय ठरला होता. एखाद्या प्रादेशिक पक्षाच्या नेत्याची राष्ट्रीय पातळीवर घेतलेली ही मोठी दखल होती. विशेष म्हणजे, ठाकरे घराण्यात पहिल्यांदाच कुणी तरी राज्याबाहेर जाऊन अशा प्रकारे जोरदार शक्तीप्रदर्शन केलं होतं. उद्धव यांच्या या झंझावातापुढे भाजपलाही बॅकफूटवर जावं लागलं. ' अब हर हिंदू की यही पुकार है, पहिले मंदिर फिर सरकार', अशा गर्जनेनं अयोध्यानगरी दुमदुमली. ही गर्जना दिल्लीच्या तख्ताला इशारा देणारी नक्कीच ठरली आहे. उद्धव ठाकरेंनी, 'राम मंदिर बांधल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही', अशी घोषणा करत आगामी निवडणुकीत सेनेचा अजेंडा स्पष्ट केला आहे.


Loading...स्वबळाचा नारा

उद्धव ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. मागील निवडणुकीत भाजपसोबत झालेली रस्सीखेच लक्षात घेऊन भाजपवर पहिल्यापासून दबाव टाकण्याचा प्रयत्न उद्धव यांनी केला आहे. मध्यंतरी सेना आणि भाजपमध्ये पालघर लोकसभा पोटनिवडणुकीवरुन चांगलेच मतभेद निर्माण झाले होते. त्यामुळे भाजपाध्यक्ष अमित शहांना 'मातोश्री'वर येऊन मध्यस्थी करावी लागली होती. सेना राम मंदिराच्या मुद्यावर आक्रमक झाली, तर दुसरीकडे पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाचा फटका बसला. जनतेच्या मनात काय चाललंय हे हेरून भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे

अमित शहा यांनी, आगामी निवडणुकीत सेनेसोबत युती शिवाय पर्याय नाही, असं स्पष्ट केलं. शहांच्या या भूमिकेमुळे सेनेला डावलणाऱ्या भाजप नेत्यांच्या शिडीतून हवा निघून गेली. सेनेचं पारडं सध्या जड आहे, त्यामुळेच कोणत्याही भाजप नेत्याला सेनेविरोधात बोलण्यास मज्जाव घातला आहे.
पंतप्रधानांवर टीका आणि राहुल गांधींचं कौतुक?


उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जाहीर सभांमधून अनेक वेळा टीका केली. पण, अलीकडेच त्यांनी चक्क काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा जाहीर सभेत उल्लेख करून मोदींवर निशाणा साधला.  राहुल गांधी यांनी मोदींना पहारेकरी चोर आहे, अशी टीका केली होती, याची री ओढत  पंढरपूर इथं झालेल्या सभेत उद्धव यांनी मोदींवर टीका केली. राहुल गांधीचा उल्लेख केल्यामुळे भाजप नेत्यांना हा मुद्दा चांगलाच जिव्हारी लागला. काही दिवसांपूर्वीच संघाचे समजले जाणाऱ्या 'तरुण भारत' दैनिकाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.


मराठा आरक्षण आणि सेना


मराठा आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला. सेनेनं आधीपासून मराठा आरक्षणाबाबत तटस्थ राहणे पसंत केले. जेव्हा विरोधकांनी मराठा आरक्षणाबाबतचा मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडण्यावर ठाम होते, तेव्हा सेनेनं आम्ही सत्तेत आहोत, असं सांगत सरकार १६ टक्के आरक्षण देईल, अशी भूमिका घेतली. खुद्द चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाच्या घोषणेआधी मातोश्रीवर जाऊन उद्धव यांच्याशी चर्चा केली. फडणवीस यांनी मराठा आरक्षणाची घोषणा केली, तेव्हा खुद्द उद्धव ठाकरे आझाद मैदानावर जाऊन मराठा आंदोलकांना भेटले. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या हस्ते  मराठा आंदोलकांनी उपोषण सोडलं. सरकारने मेगाभरतीची घोषणा केली तर सेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या खात्यातील परिवहन खात्यातून मराठा तरुणांना डोळ्यासमोर ठेवून जम्बो भरतीची घोषणा केली.


प्लास्टिक बंदी


सेनेचे नेते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला. राज्य सरकारचा हा निर्णय असला तरी, सेनेनं याचा श्रेय पुरेपूर पद्धतीने घेतला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या या निर्णयाच्या प्रक्रियेत आदित्य ठाकरे सोबत होते.


आंदोलनात सहभागी


शिवसेना सत्तेत असून सरकारविरोधात भूमिका घेत असते. यावर उद्धव ठाकरेच असं म्हणता की, '"आम्ही सत्तेत असलो तरी आधी जनतेकडून आहोत, त्यांचा आवाज पोहोचवण्यासाठी आंदोलन करतो." दुष्काळाच्या प्रश्नावर आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनात सेनेनं जाहीर पाठिंबा देत सहभाग घेतला होता. एवढंच नाहीतर दुष्काळाच्या प्रश्नावर उद्धव यांनी आपल्याच नेते आणि मंत्र्यांना दुष्काळभागाचे दौरे करा आणि सरकारला धारेवर धरा असे आदेशच दिले आहे.


RPW


निवडणुका आणि शिवसेना


स्थानिक आणि महापालिका निवडणुकीत सेनेला या वर्षात फार अपेक्षित यश मिळाले नाही. प्रतिष्ठेची केलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत सेनेला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. नगरपरिषदा आणि ग्रामपंचायत निवडणुकीत सेनेच्या जागेत घट झाली आहे. या निवडणुकीत राज्यभरात भाजपचे सर्वाधिक नगराध्यक्ष निवडून आले आहे. सांगली, धुळे, जळगाव निवडणुकीत सेनेला फटका बसला आहे. अहमदनगर पालिका निवडणुकीत सेनेनं सर्वाधिक जागा जिंकल्यात पण महापौरपद गमवावे लागले आहे. यावर अजूनही सेनेकडून कोणतीही भूमिका मांडण्यात आली नाही, हे विशेष.


एकंदरीतच, वाद आणि शिवसेना हे जुणं समिकरण आहे. सरत्या वर्षात उद्धव यांनी भाजपवर दबाव वाढवून आम्हाला वगळून पुढं जाताच येणार नाही हेच दाखवून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 31, 2018 06:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...