S M L

एक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत

यश विनोद भरतीया या तरुणांकडून अल्पवयीन मुलांने उसनवारीने 1 हजार रुपये घेतले होते.

Sachin Salve | Updated On: Apr 25, 2018 04:26 PM IST

एक हजार रुपयांसाठी तरुणाची हत्या, 3 अल्पवयीन मुलं अटकेत

यवतमाळ, 23 एप्रिल : एक हजार रुपयांच्या वादातून अल्पवयीन मुलांनी एका 19 वर्षीय तरुणाची हत्या केल्याची खळबजनक घटना यवतमाळमध्ये घडलीये. यश विनोद भरतीया असं मृत तरुणाचं नाव आहे.

शहरातील आर्णी नाका परिसरात संध्याकाळच्या सुमारास ही घडली. याच भागात राहणाऱ्या यश विनोद भरतीया या तरुणांकडून अल्पवयीन मुलांने उसनवारीने 1 हजार रुपये घेतले होते. मात्र ते वेळेत परत केल्या गेले नाही म्हणून मृतक यश पैशासाठी तगादा लावला. याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे संतापलेल्या अल्पवयीन तरुणाने यश ला  पैसे परत देण्याचे कारण सांगून आर्णी नाक्याजवळ बोलावले.

यश त्याठिकाणी पोहचता क्षणीच त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करण्यात आले. यात यशचा मृत्यू झाला. भर वस्तीत झालेल्या या खुनाच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणी पोलिसांनी 3 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 23, 2018 11:32 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close