News18 Lokmat

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीकडून साहित्य संमेलनाचं उद्घाटन?

लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाचं उद्घाटन कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jan 10, 2019 01:34 PM IST

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पत्नीकडून साहित्य संमेलनाचं उद्घाटन?

यवतमाळ, 10 जानेवारी : यवतमाळ इथं होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आत्महत्या केलेल्या एका शेतकऱ्याच्या पत्नीच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. लेखिका नयनतारा सहगल यांना दिलेलं निमंत्रण रद्द केल्यानंतर संमेलनाचं उद्घाटन कोण करणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

उद्घाटनाला मुख्यमंत्री राहणार गैरहजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार नाहीत. दिल्लीत भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक असल्याने मुख्यमंत्री फडणवीस साहित्य संमेलनाला हजेरी लावू शकणार नाहीत, असं भाजपकडून सांगण्यात आलं आहे.

लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून बोलावलं होतं, पण नंतर अचानक त्यांचे निमंत्रण रद्द करण्यात आलं. यामुळे मोठा वाद झाला. अशातच मुख्यमंत्री फडणवीस यांनीही संमेलनाला जाणं टाळलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री गैरहजर राहण्यामागे भाजपची राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक हेच कारण आहे की सहगल वादामुळे देवेंद्र फडणवीसांनी संमेलनाच्या उद्घाटनाला येण्याचं टाळला, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

काय आहे वाद?

Loading...

ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांना यवतमाळ इथं होणाऱ्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घघाटनाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. पण सहगल यांच्या उद्घाटनावेळी होणाऱ्या भाषणाची प्रत समोर आली आणि अचानक त्यांचं निमंत्रण रद्द करण्यात आलं.

सहगल यांच्या या भाषणात त्यांनी सध्याच्या वातावरणाबाबत परखड मतं व्यक्त करत सरकारवर टीका केली असल्याचं पाहायला मिळालं. सरकारवरील टीकेमुळेच त्यांचं निमंत्रण रद्द केलं, असा आरोप करत अनेक साहित्यप्रेमी आणि विरोधी पक्षांकडूनही सरकारला लक्ष्य करण्यात आलं.

शिवसेनेचा भाजपवर निशाणा

'यवतमाळच्या 92 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास नयनतारा सहगल यांना उद्घाटक म्हणून बोलावले होते, पण महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांची नयनतारा यांच्या भाषणाने गोची होऊ शकते, अशी भीती वाटल्याने त्यांचे निमंत्रण रद्द केले आहे,' असं म्हणत 'सामना'च्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.


VIDEO : हार्दिकला समजली स्वत:ची चूक, ट्विटरवरून म्हणाला...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 10, 2019 01:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...