News18 Lokmat

नरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर!

T1 या नरभक्षक वाघिणीने सराटीच्या जंगल परिसरात एका गोऱ्ह्याची (बैल) शिकार केलीय. शिवाय या भागात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरात वाघिणीची छायाचित्रेही कैद झाली आहेत.

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2018 11:59 PM IST

नरभक्षक वाघिणीने फस्त केला गोऱ्हा; आता वन विभागाच्या ट्रॅपवर!

भास्कर मेहरे, यवतमाळ, 18 ऑक्टोबर : T1 या नरभक्षक वाघिणीने सराटीच्या जंगल परिसरात एका गोऱ्ह्याची (बैल) शिकार केलीय. ही बाब वन विभागाच्या एका पथकाला आढळून आलीय. T1 वाघिणीचे पगमार्क सुद्धा या भागात या पथकाला आढळून आलेत. शिवाय या भागात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरात वाघिणीची छायाचित्रेही कैद झाली आहेत. वनविभागाने आता आपली शोध मोहिम या भागात केंद्रित केली असून, शार्प शूटर नवाबसह वन विभागाची संपूर्ण टीम या भागात डोळ्यात तेल घालून वाघिणीचा शोध घेत आहे.

यवतमाळ जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या नरभक्षक वाघिणींनीने गेला महिनाभरात सर्वांनाच गुंगारा दिला. मात्र, आता तिचा ठावठिकाणा लागलाय. तिला पकडण्यासाठी आरंभलेल्या शोध मोहिमेदरम्यान वन विभागाला आणखी एक आशेचा किरण सापडलाय. दोन दिवसांपूर्रावी ळेगावच्या जंगलात वाघिणीचे आणि तिच्या बछड्यांच्या पायाचे ठसे आढळून आले होते, त्याच नरभक्षक वाघिणीने सराटीच्या जंगल परिसरात एका गोऱ्ह्याची शिकार केलीय.  ही बाब वन विभागाच्या एका पथकाला आढळून आलीय. T1 वाघिणीचे पगमार्क सुद्धा या भागात या पथकाला आढळून आलेत. शिवाय या भागात लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेरात वाघिणीची छायाचित्रेही कैद झाली आहेत.

13 जणांचा जीव घेणाऱ्या या वाघिणीला ठार मारण्याच्या आदेशाला सुप्रीम कोर्टानं हिरवा कंदील दिल्यापासून टी-1 नामक या नरभक्षक वाघिणीच्या मागावर वनविभाग आहे. एक महिना जंगजंग पछाडूनही निराशा हाती लागलेल्या वनविभागासाठी वाघिणीसह दोन बछड्यांच्या पायांचे आढळलेले ठसे आणि आता सराटीच्या जंगल परिसरात एका गोऱ्ह्याची शिकार, तसेच पगमार्गासह ट्रॅप कॅमेरात कैद झालेली वाघिणीची छायाचित्रे या सर्व बाबी वन विभागाने आरंभलेल्या शोध मोहिमेला फायद्याच्या ठरणाऱ्या आहेत. त्यामुळे आतापर्यंत हवेत तीर मारणाऱ्या वनविभागाला नरभक्षक वाघीण हाती लागण्याची आशा निर्माण झालीय.

 मीटू ते राममंदिर,उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील १० प्रमुख मुद्दे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 18, 2018 11:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...