News18 Lokmat

आता इटालियन कुत्रे घेणार 'त्या' नरभक्षक वाघिणीचा शोध!

'मिशन टी-1 कॅपचर' मोहिमेत आता प्रसिद्ध शार्प शूटर नवाब शाफत अली खान सोबतच आंतरराष्ट्रीय गोल्फ पटू ज्योती रंधावा त्यांच्या दोन प्रशिक्षित इटालियन कुत्र्यांसह सहभागी झालाय.

News18 Lokmat | Updated On: Oct 10, 2018 04:43 PM IST

आता इटालियन कुत्रे घेणार 'त्या' नरभक्षक वाघिणीचा शोध!

यवतमाळ, 10 ऑक्टोबर - जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक वाघिणीला जेरबंद किवा ठार मारण्याच्या 'मिशन टी-1 कॅपचर' मोहिमेत आता प्रसिद्ध शार्प शूटर नवाब शाफत अली खान सोबतच आंतरराष्ट्रीय गोल्फ पटू ज्योती रंधावा त्यांच्या दोन प्रशिक्षित इटालियन कुत्र्यांसह सहभागी झालाय. त्यामुळे आता या मोहिमेला आणखी वेग मिळालाय. रंधवा हे गोल्फपटू तर आहेत, शिवाय श्वान प्रशिक्षकही आहेत. त्यांच्याकडे केन कोर्सो या इटालियन प्रजातीचे दोन श्वान आहेत. अंगाने धिप्पाड असलेले हे श्वान निडर असतात आणि वाघिणीचा माग काढण्यात अतिशय तरबेज असतात.

13 जणांचा बळी घेणाऱ्या या नरभक्षक वाघिणीला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने गेल्या 29 दिवसापासून मोहीम सुरू केली आहे. त्यासाठी मोठा फौज फाटा तैनात करण्यात आलाय. सुरूवातीला हत्ती, ड्रोन सारख्या तंत्रज्ञांनाचा उपयोग करण्यात आला. मात्र, नरभक्षक वाघिणीला पकडण्यात वन विभाग अपयशी ठरलं. वन विभागातील अधिकार्यांसोबत झालेल्या वादामुळे शार्प शूटर नवाब यांना वापस पाठवण्यात आलं होतं. आता त्यांना परत बोलावण्यात आलं असून त्यांच्यासोबत ज्योती रंधावा सुद्धा या मोहिमेत सहभागी झाले आहेत. रंधावा हे प्रसिद्ध श्वान प्रशिक्षक आहेत, शिवाय त्यांच्या कडे असलेल्या कार्लोस आणि बस्टर या दोन कुत्र्यांचा मोहिमेत चांगला उपयोग होऊ शकतो.

शार्प शूटर नवाब आणि ज्योती रंधावा यांच्यासोबत त्यांनी आणलेले इटालियन कुत्रे जंगल पिंजून काढताहेत. रंधावा यांचे दोन्ही श्वान इतके हुशार आहेत की, वाघिणीच्या मूत्राचा वास घेऊन ते तिचा शोध घेऊ शकतात.

 VIDEO: लायसन्स मागितलं म्हणून रिक्षा चालकाने महिला पोलिसाला फरफटत नेलं!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 10, 2018 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...